BREAKING NEWS:
गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महाविद्यालयात उत्साहात साजरा चामोर्शी -तालुक्यातील आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे विविध उपक्रमांचे आयोजन

Summary

आष्टी        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे दिनांक 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे सर्व उपक्रम प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या […]

आष्टी
       स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे दिनांक 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे सर्व उपक्रम प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात पार पडले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छता अभियानाने झाली. महाविद्यालय परिसरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. विद्यार्थ्यांना “हर घर तिरंगा” या अभियानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यासोबतच पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या पोस्टर्स आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात, 9 ते 12 ऑगस्ट या कालावधीत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या कार्यावर आधारित व्याख्यान झाले. 11 ऑगस्टला भारतीय संविधानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले, तर 12 ऑगस्ट रोजी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान घेण्यात आले. त्याचबरोबर “फोटो विथ तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात आला तसेच “माझा देश, माझा अभिमान” या विषयावर निबंध स्पर्धा पार पडली.
तिसऱ्या टप्प्यात, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभक्तीपर उपक्रमांनी वातावरण भारले गेले, तीन दिवस राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक सादर केली. 14 व 15 ऑगस्टला तिरंगा रॅलीद्वारे गावात उत्साही वातावरण निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व शाळा व महाविद्यालयांनी एकत्र येऊन अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीताठी प्रा. डॉ. मुसने, डॉ. खूने, डॉ. पांडे, डॉ. शास्त्रकार, डॉ. कोरडे, प्रा. बोभाटे मॅडम, सालुरकर मॅडम, गभणे मॅडम यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आणि रा.से.यो. स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

 

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *