स्वयंरोजगाराद्वारे उद्योजक बनण्याची सुवर्ण संधी युवती, महिला व पुरुषांकरीता निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Summary
प्रतिनिधी भंडारा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय शाखा भंडारा च्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र भंडारा येथील योजनेनुसार भंडारा जिल्हा येथे विविध तालुक्यांच्या ठिकाणी उद्योग विषयक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रस्तुत निःशुल्क अभ्यासक्रमांची […]

प्रतिनिधी भंडारा
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय शाखा भंडारा च्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र भंडारा येथील योजनेनुसार भंडारा जिल्हा येथे विविध तालुक्यांच्या ठिकाणी उद्योग विषयक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रस्तुत निःशुल्क अभ्यासक्रमांची एकूण संख्या ही भंडारा जिल्हा येथे १६ आहे. त्यात सर्वसाधारण घटक अर्थात जनरल कॅटेगरी करीता एकूण ६ निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून; विशेष घटकांकरीता अर्थात अनुसूचित जाती, जमाती करीता एकूण ९ प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत, तसेच ओटीएसपी घटक करीता फक्त एक निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तुत निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचा कालावधी कमीत कमी ३० दिवसांचा असून जास्तीत जास्त ४५ दिवसांपर्यंत चे सुद्धा निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत. प्रस्तुत निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय नागपूर शाखा भंडारा अर्थात एमसीईडी कार्यालय भंडारा तर्फे करण्यात आले असून प्रस्तुत निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे प्रायोजक कर्ते हे शासकीय जिल्हा उद्योग केंद्र भंडारा हे आहेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय नागपूर शाखा जिल्हा भंडारा येथील विविध तालुक्यांतील नियुक्त कार्यक्रम आयोजकांशी आपण संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र संस्थेचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. कु. काजल राठोड मॅडम यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व जनतेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रस्तुत उद्योजकता विषयक निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांची वैशिष्ट्ये म्हणजे उमेदवार हे स्वतःचे लघुउद्योग स्थापन करण्यास योग्य होणार असून त्यांच्यासाठी शासकीय योजना व अनुदान मिळण्यास शासनाची सर्व दारे उघडी राहणार आहेत, जिल्हा उद्योग केंद्र च्या कर्ज योजना व लघु उद्योग नोंदणी ई उमेदवारास लागू तसेच योग्य राहणार आहेत, प्रकल्प अहवाल निःशुल्क तयार करून देण्यात येणार आहे. बँकेच्या कार्यपद्धती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन मिळाल्याने ग्रामीण भागात ३५% तसेच शहरी भागात २५% सबसिडी वर लोन मिळवण्यास उमेदवार योग्य राहणार आहे.
सर्व साधारण घटकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकूण ६ निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती:-
१) फोटीग्राफी/व्हिडिओग्राफी:- प्रस्तुत प्रशिक्षणाचे स्थळ हे भंडारा तालुक्यात असून कालावधी एकूण ३० दिवसांचा आहे.
२) घरगुती रासायनिक उत्पादने तयार करणे:- स्थळ – तालुका साकोली; कालावधी : ३४ दिवस
३) एम्ब्रोडर फॅशन डिझायनिंग:- स्थळ: तालुका भंडारा; कालावधी: ३१ दिवस
४) पेपर प्रोजेक्ट (डिस्पोजल बॅग्स इत्यादी):- स्थळ – तालुका मोहाडी; कालावधी: ३० दिवस
५) ऍग्रो प्रोसेसिंग:- स्थळ – तालुका तुमसर; कालावधी: ३२ दिवस
६) ऍग्रो प्रोसेसींग:- स्थळ – तालुका पवनी; कालावधी: ३० दिवस
विशेष घटक अर्थात अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींकरीता एकूण ९ निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
१) डी.टी.पी.:- स्थळ – तालुका भंडारा; कालावधी: ३० दिवस
२) ब्युटी पार्लर:- स्थळ – तालुका भंडारा; कालावधी: ४५ दिवस
३) गार्मेंट मैंन्यूफॅक्चरिंग:- स्थळ – तालुका लाखनी; कालावधी: ४५ दिवस
४) हेअर अँड स्किन केअर:- स्थळ – तालुका साकोली; कालावधी: ३० दिवस
५) पेपर प्रोजेक्ट (डिस्पोजल बॅग्स इत्यादी):- स्थळ – मोहाडी; कालावधी: ३० दिवस
६) गारमेंट मैन्युफॅक्चरींग:- स्थळ – तालुका तुमसर; कालावधी: ३० दिवस
७) होम अप्लायन्सेस मेंटेनन्स अँड रिपेयरींग:- तालुका पवनी; कालावधी ३० दिवस
८) बॅग मेकिंग:- स्थळ – तालुका लाखांदूर; कालावधी: ३० दिवस
९) हेअर अँड स्किन केअर:- स्थळ – तालुका भंडारा; कालावधी: ३० दिवस
ओ.टी.एस.पी घटकांकरिता गारमेंट मेन्यूफॅक्चरींग हे एकच निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम असून प्रस्तुत कार्यक्रम हे तुमसर तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. प्रस्तुत निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम हे ३० दिवसांचे आहे.
वरील सर्व निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थींना उद्योग व्यवस्थापनेचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यांमध्ये विपणन अर्थात मार्केटिंग व्यवस्थापन कौशल्य, सेल्स टॅक्स अँड अदर टॅक्सर, कॉम्युनिकेशन स्किल्स, मुलाखतींचे तंत्र, व्यक्तिमत्व विकास यांबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी पात्रता:- उमेदवार किमान ८वी पास असावा/आय.टी.आय./पदवीधर यांनी सुद्धा अर्ज करायचे आहे.
वयोगट:- उमेदवार किमान १८ वर्षांचा असावा किंवा कमाल ४५ वर्षांचा असावा ( १८ ते ४५ वर्षे)
प्रशिक्षणार्थी मर्यादा:- प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी मर्यादा ही ३० आहे.
आवश्यक कागदपत्रे:- १) जिल्ह्याचा रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड
२) टी.सी.
३) मार्कशिट
४) बँक पासबुक
५) बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती
तसेच उमेदवार कुठल्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, लाभार्थी निवड जिल्हा समितीद्वारे करण्यात येईल.
स्टायफंड मिळेल १०००/- प्रशिक्षण कालावधी ३० दिवसांचे मिळून
स्टायफंड मिळेल १५००/- प्रशिक्षण कालावधी ४५ दिवसांचे मिळून
अधिक माहिती व प्रवेशाकरीता संपर्क कु. काजल राठोड, प्रकल्प अधिकारी, म. उ. वि. के. भंडारा
मो. क्र. ७६६६१३६३८९/7666136389
तसेच जिल्हा उद्योग केंद्र भंडारा येथील महाव्यवस्थापक यांच्याशी सुद्धा संपर्क साधता येऊ शकतो.
संगीता चव्हाण, मो. क्र. ७०२०५६५५७६/7020565576
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही दिनांक ०९-०८-२०२३
स्थळ:- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भंडारा
जि. प. चौक, दैनिक लोकमत समाचार कार्यालयाच्या वर ता. जि. भंडारा असे आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी ) द्वारे राज्यस्तरावर प्रकाशित मराठी भाषेतील एकमेव उद्योजकीय मन घडविणारे मासिक. आपणास (1) वार्षिक वर्गणी रु. 900/- भरल्यास आपणास रु.1000/-ची (2) द्विवार्षिक वर्गणी रु. 1700/- भरल्यास आपणास रु. 2000/-ची (3) त्रिवार्षिक वर्गणी रु. 2500/- भरल्यास आपणास रु. 3000/- ची मासिके घरपोच कोणतेही चार्ज न घेता पोष्ट द्वारे मिळतील. तरी आपण या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित खालील लिंक चा वापर करून नोंदणी करावी. Officer code 91 लिहावे व आपली रिसिप्ट मो .7666136389 वर व्हट्सप करावी. कृपया आपल्या सर्व संपर्कात पाठवून सहकार्य करावे. लिंक:-
https://www.mced.co.in/subscription