स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची बाइक चोरांवर कार्यवाही
प्रतिनिधी भंडारा
प्रकरण असे की दिनांक ०१-०५-२०२३ रोजी पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोळकर, पोलीस हवालदार प्रदीप डाहारे, पोलीस हवालदार नितीन महाजन, पोलीस हवालदार किशोर मेश्राम, पोलीस हवालदार नंदकिशोर मारबते, पोलीस हवालदार विजय तायडे, पोलीस हवालदार रमेश बेंदूरकर, पोलीस अंमलदार मंगेश माळोदे, पोलीस अप्पर सचिन देशमुख, पोलीस अंमलदार सचिन देशमुख, पोलीस अंमलदार जगदीश श्रावणकर हे मोटरसायकल चोरीचे आरोपी शोध साठी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर प्राप्त झाली आरोपी नामे १) धम्मराज नेमीचंद मेश्राम वय २४ राहणारा सेलोटी २) चैतन्य संजीव मेश्राम वय २३ राहणारा मानेगाव सडक असे दोघेही मिळून नजीकच्या कालावधीमध्ये साकोली परिसरात चोऱ्या करीत असून सध्या पोलीस स्टेशन लाखनी परिसरात चोरीची मोटर सायकल घेऊन फिरत आहेत अशा खबरे वरील पथकाने आरोपी क्र. १) धम्मराज नेमीचंद मेश्राम वय २४ वर्ष राहणारा सेलोटी २) चैतन्य संजीव मेश्राम वय २३ वर्ष राहणारा मानेगाव (सडक) या दोघांना विना नंबरच्या सिल्वर रंगाची पल्सर मोटरसायकल सोबत ताब्यात घेऊन त्यांना सखोल विचारपूस केली असता साकोली पोलीस स्टेशन हद्दीतील ६ गुन्हे व १ गून्हा केल्याचे मान्य केले. त्यावरून एक सिल्वर रंगाची बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक MH-49-BA-5483 किमती ६०,०००/- रुपये एक होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल क्र. MH-49-AW-6494 किंमती ३५,०००/- रू जुने लोखंडी साहित्य गजलेले अंदाजे किंमत ३८००/- रुपये असा एकूण ९८,८००/- रुपये चा माल जप्त कारवाई करून पुढील तपास करिता पोलीस स्टेशन साकोली ताब्यात दिले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री रोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोळकर, पोलीस हवालदार प्रदीप डाहारे, पोलीस हवालदार नितीन महाजन, पोलीस हवालदार किशोर मेश्राम, पोलीस हवालदार नंदकिशोर मारबते, पोलीस हवालदार विजय तायडे, पोलीस हवालदार रमेश बेदुरकर, पोलिस अंमलदार मंगेश माळोदे, पोलीस अंमलदार सचिन देशमुख, पोलीस अंमलदार जगदीश श्रावणकर, सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केलीय.