महाराष्ट्र यवतमाळ हेडलाइन

‘स्त्री शक्ती समाधान शिबिर’ महिलांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ – पालकमंत्री संजय राठोड ३८ तक्रारीचे जागेवरच निराकरण

Summary

यवतमाळ, दि १ जून, जिमाका:- महिलांच्या समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे हे व्यासपीठ अतिशय महत्वाचे असून सर्व स्तरातील महिलांनी याचा लाभ घेऊन विविध क्षेत्रात उन्नती साधावी, […]

यवतमाळ, दि १ जून, जिमाका:- महिलांच्या समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे हे व्यासपीठ अतिशय महत्वाचे असून सर्व स्तरातील महिलांनी याचा लाभ घेऊन विविध क्षेत्रात उन्नती साधावी, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर समाधान शिबिराचे उद्घाटन संजयभाऊ राठोड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना मागदर्शन करताना ते बोलत होते.  यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर , नायब तहसीलदार श्री. थोटे,  गटविकास अधिकारी राजीव शिंदे ,  मुख्याधिकारी नगरपरिषद श्री. जाधव, गटशिक्षण अधिकारी देशपांडे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मानिक घोडसरे,बाल विकास प्रकल्प अधिकारीराजेश घोडे, उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच कर्तव्य कठोर राज्यकर्त्या होत्या. त्यांचे कार्य महिलांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे. राज्य सरकारही महिलांच्या विकास व उन्नतीसाठी विशेष जागरूक असून महिलांच्यासाठी विविध योजना राबवीत आहे. बालकांसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा असे त्यांनी सांगितले. तसेच या समाधान शिबिराच्या माध्यमातुन महिलांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री श्री राठोड यांनी केले.

या समाधन शिबिरात सर्व तालुका विभाग प्रमुखांनी  उपस्थित राहून  महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली आणि समस्यांचे निराकरण केले.

            प्रत्येक विभागाची महिती देण्यासाठी आणि समस्या स्वीकृती आणि निराकरणासाठी 16  स्टॉल लावण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिलांनी स्टॉलला भेटी देऊन महिती घेतली.

            शिबिरात एकूण 393 महिला लाभार्थी सहभागी होत्या. एकूण 72 तक्रारी प्राप्त झाल्या त्यात 38 तक्रारीचे निवारण जागेवरच  करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन श्रीमती.वर्षा घावडे अंगणवाडी सेविका यांनी तर प्रास्तविक राजीव शिंदे यांनी केले. आभार मनीषा कुंदापवार पर्यवेक्षिका यांनी मानले.

कार्यक्रमासाठी संरक्षण अधिकारी शांतीकुमार राठोड, पर्यवेक्षिका प्रगती वानखडे , मनीषा कुंदापवार, दिनेश ढाले, पुरुषोत्तम तिजारे व प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.

                                                     ००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *