स्तृत्य उपक्रम : शिवसेनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार : शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुटुंबियांना आर्थिक मदत : बाळासाहेबांच्या विचारसरणीला शिवसैनिकांची चालना
Summary
चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा चंद्रपूर तर्फे आज दि. २३/०१/२०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील १) शंकर वारलू बोरकुटे वय ४१ वर्षे […]
चंद्रपूर :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा चंद्रपूर तर्फे आज दि. २३/०१/२०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील
१) शंकर वारलू बोरकुटे वय ४१ वर्षे रा. पाचगाव
२) प्रभाकर बापूजी वैद्य वय ३३ रा. पांढरपौवणी
या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती ही बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना कळताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी अनुसार तसेच ८० % समाजकारण व २० % राजकारण या धोरणानुसार या दोन्ही कुटूंबियांना प्रत्यक्ष भेट देत शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे प्रत्येक कुटुंबाला १०,००० रूपये आर्थिक सहाय्य करत त्यांच्या दु:खात सहभागी झाले.
यावेळी सतिश भिवगडे (मा.जिल्हाप्रमुख) जयदिप रोडे (भा.का.से.जिल्हाध्यक्ष) मनोज पाल (मा.शहरप्रमुख) शालिक फाले (मा.तालुकाप्रमुख,पं.स. सदस्य) राजेश नायडू (शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष) सौ विजया रोगे(जिल्हा संघटिका महिला आघाडी) पप्पू बोपचे, पंकजसिंग दिक्षित, रिझवान पठाण,संजय शहा तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
युवकांमध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवून लढण्याची ताकद निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कार्यालय बंगाली कॅम्प येथे शिवसेनेतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी शिवसेना महानगरप्रमुख मनोज पाॅल, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सतिश भिवगडे, कामगार सेना जिल्हाप्रमुख जयदिप रोडे, शालिक फाले माजी तालुका प्रमुख, पप्पु बोपचे, नितीन शहा, पंकजसिंग दिक्षित, राजकुमार पाचभाई, माधव पाल, श्रीकांत दडमल तसेच इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर