हेडलाइन

सौ सुनिता मेश्राम ला न्यायालयाचा दिलासा, सरपंच पद्दी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा

Summary

सौ सुनिता मेश्राम ला न्यायालयाचा दिलासा, सरपंच पद्दी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा   कन्हान : – नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त यांनी अपात्र ठरविलेल्या टेकाडी (को ख) ग्राम पंचायतच्या सरपंचा सुनिता मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पुन्हा सौ सुनीता […]

सौ सुनिता मेश्राम ला न्यायालयाचा दिलासा, सरपंच पद्दी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा

 

कन्हान : – नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त यांनी अपात्र ठरविलेल्या टेकाडी (को ख) ग्राम पंचायतच्या सरपंचा सुनिता मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पुन्हा सौ सुनीता मेश्राम या सरपंचपदी आरूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पारशिवनी तालुक्यातील सर्वात मोठी टेकाडी (को ख) ग्राम पंचायत आहे.थेट जनतेतुन निवडून आलेल्या सरपंचा सौ सुनीता मेश्राम यांचेवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवुन नागपुर विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांनी एका आदेशान्वये दोन ऑगस्ट २०२१ ला अपात्र ठरवि ले होते. त्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नाग पुर खंडपीठात आवाहन याचिका सौ मेश्राम यांनी दाखल केली होती. त्या याचिकेचा निर्णय २२ फेब्रुवारी ला लागला. हा निकाल सरपंचा मेश्राम यांच्या बाजुने लागला आहे. ग्राम पंचायत सदस्य आशा राऊत व उप सरपंचा मीनाक्षी बुधे यांनी पारशिवणी चे खंडविकास अधिकारी यांना लेखी तक्रार करून सरपंचा मेश्राम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. खंडविकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल तयार केला व नागपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपा लन अधिकारी यांना पाठविला. मुख्य कार्यपालन अधि कारी यांनी अप्पर आयुक्त यांना तो अहवाल पाठवुन कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ , ३९ (१) नुसार गेल्या २ आगस्ट २०२१ ला अप्पर आयुक्तांनी मेश्राम यांना अपात्र ठरविले होते. या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालया च्या नागपुर खंडपीठात मेश्राम यांनी याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजुचा युक्तिवाद लक्षात घेऊन उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठाचे न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अप्पर आयुक्तांनी केलेली कारवाई अनुचित ठरवुन मेश्राम यांच्या बाजुने निकाल दिला. मेश्राम यांच्या वतीने अँडव्हकेट एस. पी.भंडारकर यांनी बाजु लढवली.

 

संजय निंबाळकर, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *