सोशल मिडीयात काहीही कायदेशीर पात्रता नसताना गधेही पहेलवान बनतात.. हे कोण प्रवीण जाधव?

सोशल मिडीयात काहीही कायदेशीर पात्रता नसताना गधेही पहेलवान बनतात.. हे कोण प्रवीण जाधव? त्यांनी डाकूमेण्टसह पात्रता जाहीर करावी .. सिजे अशी खैरात असती तर ह्यांचे बाप
जादेही सिजे झाले असते, केवळ आम्हीच देशात खूप मोठे आहोत हे सांगणाऱ्याना कायदेशीर पात्रता,अनुभव धारण करणाऱ्यानी मारलेली चपराक आहे.हे पद भारतीय संविधानातील स्वतंत्र विंगचे अर्थात न्यायव्यवस्थेचे तीन विंग मध्ये सर्वोच्च पद आहे हे विसरू नका, कुठल्या केस मध्ये काय न्याय द्यायचा हा न्यायाधिशांचा अधिकार असतो, कायद्याचे ऐकीव ज्ञान असणाऱ्यांना कायदा समजायला वेळ लागेल…उदो उदो नव्हे ही वास्तविकता.. सुप्रिम कोर्ट हे आपल्या देशातील सर्वोच्च पद तर आहे, भातीय राज्यघेटनेचे संरक्षक पालक आहेत, सोबतच कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ ह्या दोन यंत्रानेला चेक अँड बॅलेन्स व केलेल्या कायद्याला आकलन वा पुनरावलोकन करणारे देशातील सर्वोच्च पद आहे, हे पद आमदार, खासदार वा, मंत्री, प्रधानमंत्री वा कुठल्याही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपद नव्हे ज्याबद्दल काहीही घाण ओकता येते वा लिहिता येते.. थोडी कायद्याची जाणीव ठेवुन बोलल्यास बरे, व न्यायव्यस्थेला तेही सुप्रीम कोर्ट चीफ जस्टीस ला कुणी पदावर असताना कुठल्याही पार्टिचा राष्ट्रीय अध्यक्ष सल्ला देत नाही हेही ध्यानात ठेऊन बोलल्यास बरे होईल अन्यथा आपल्या नेत्याचा मोठेपणा ऐवजी बालिश पणा दिसेल .. ॲड.डॉ.सत्यपाल कातकर, मनोवैज्ञानिक, माजी प्राचार्य तथा लेखक.