सोलार एक्स्प्लॉजिव मधे स्फोट – स्फोटात सहा महिला व तीन पुरुष कामगार असे नव कामगार ठार सुदैवाने तीन कामगार बचावले
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव नजीक चाकडोह येथील आंतरराष्ट्रीय दर्जा सोलार एक्स्प्लॉजिव लिमिटेड दारूगोळा कंपनीत आज रविवार 17 डिसेंबरला सकाळी आठ वाजून 43 मिनिटांनी येथील सीबीएच टू (CBH2)या युनिटमध्ये TNT रसायनांचा (trinytro)पॅकेजिंग करताना स्फोट होऊन नउ 9 कामगाराचा स्फोटात मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून यात सहा महिला व तीन पुरुष कामगारचा समावेश आहे
दारूगोळा उत्पादन क्षेत्राततील सोलार एक्सप्लॉसिव्ह कँपनी चाकडोह येथील कंपनीमध्ये नेहमी प्रमाणे सकाळ पाळीत 6 ते 2 वाजताच्या पाळीत कामगार CBH2 युनिट मध्ये 12 कामगार स्फोटक टी एन टी रसायन भुक्तीचे पॅकेजिंग करीत असताना तीन कामगार कामानिमित्यय युनिटच्या बाहेर आले असता दरम्यान रसायनांचा स्फोट झाला यात बिल्डिंग पूर्णपणे उधवास्त झाली व नऊ कामगारांचा दबून जागीच मृत्यू झाला यात सहा महिला व तीन पुरुषाचा समावेश असल्याचे सांगितले यात मीता प्रमोद उईके 27 रा अंबाडा सोनक काटोल ,आरती नीलकंठ सहारे 20 कामठी मासोद, श्वेता दामोदर मारबते 22 कन्नमवार ग्राम जिल्हा वर्धा, पुष्पा श्रीराम मानापुरे 36 शिराला अमरावती, भाग्यश्री सुधाकर लोणारे 23 राहणार ब्रह्ममपुरी ,रुमिता विशाल उईके 31 ढगा , युवराज किसनजी चारोडे31 राहणार बाजारगाव, ओंकार किसनलाल मच्छीरके25 राहणार बाजारगाव, सुपरवाईजर मौसम राजकुमार पटले23 पाचगाव भंडारा,असे मृतकांची नावे आहे या
घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या गेट समोर कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईक मोठ्या संख्येत गर्दी केली व आपापल्या कुटुंबाच्या व्यक्ती बाबत विचारणा करीत होते स्थानिक पोलीस ,व सुरक्षा कंपनीचे सुरक्षा रक्षक यांच्याकडून संबंधितांच्या मृतकाची माहिती घेण्याच्या प्रयत्न करीत होते रोष व आक्रोश करीत होते या दरम्यान या भागाचे आमदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तात्काळ कँपणीत पोहचून व स्फोटात बचावलेल्या संजय गुलाब आडे यांच्या कडून घटनेची विचारपूस केली व त्याचप्रमाणे भाजपा चे चरणसिंग ठाकूर ,शिवसेनाचे राजेंद्र हरने, माजी आमदार प्रकाश गजभे यांनी कँपनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी रोहन बापू व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय पखाले यांनी स्टाफ सह कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षेवर लक्ष केंद्रित करीत होते तसेच घटनेची माहिती
कंपनी व्यवस्थापक एम के सिंग यांनी माहिती केंद्रीय सुरक्षा विभागाला व राज्य सुरक्षा विभागाला कळविली पुढील कारवाई करिता केंद्रीय सुरक्षा राज्य सुरक्षा यांच्या पथकाकडून स्फोट झालेल्या घटनास्थळी सुरक्षा नियमांतर्गत पाहणी केली याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक छजिंग दोरजे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर पोलीस अधीक्षक ग्रामीण पी हर्ष पोद्दार उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे, व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समक्ष ड्रोन च्या साह्याने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली घटना स्थळाची पाहणी केली व घटना स्थळावर ढिगाऱ्याखाली दबलेल्या मृतकाना काडण्यापूर्वी संवेदनशील भाग केंद्रीय सुरक्षा विभागाद्वारे निर्मनुष्य करण्यात आला होता व मृतकाचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.