सोलापूर ब्रेकिंग! पोलिस दलात खळबळ 24 कैद्यांना कोरोनाची लागण, संपर्कातील सर्वांची होणार चाचणी
Summary
सांगोला येथील जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यांपैकी 28 कैद्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या कैद्यांच्या संपर्कातील असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. तसेच शहरात सुरू असणाऱ्या सर्व व्यापारी व त्यांच्या […]
सांगोला येथील जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यांपैकी 28 कैद्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या कैद्यांच्या संपर्कातील असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
तसेच शहरात सुरू असणाऱ्या सर्व व्यापारी व त्यांच्या कामगारांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, 289 जणांच्या कोरोना चाचणीमध्ये एकही व्यापारी, कामगार पॉझिटिव्ह आले नाहीत.
सांगोला जेलमध्ये असलेल्या 54 कैद्यापैकी 24 कायद्यांची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
या कैद्यांच्या संपर्कात अजून किती जणांचा समावेश आहे, याचा तपास घेतला जात असून या संपर्कातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
तसेच या पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना कोविड सेंटरमध्येही पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. शहरातील सर्व व्यापारी व काम करणाऱ्या कामगारांच्या तपासणीस शनिवार पासून सुरुवात झाली.
तपासणीच्या पहिल्या दिवशी 289 जणांची टेस्ट करण्यात आली असून यामध्ये एकजणही कोरोना पॉझिटिव्ह आले नाहीत. तपासणीमध्ये औषध विक्रेते, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, कापड दुकान यांनी तपासणी करुन घेत आहेत.
दुकाने तपासणी करून सील करणार
शहरातील सर्व व्यापारी व कामगारांना कोविड-19 ची चाचणी बंधनकारक असून जे दुकानदार व त्यांचे कामगार चाचणी करणार नाहीत, अशी दुकाने तपासणी करून सील करण्यात येतील– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750