महाराष्ट्र सोलापुर हेडलाइन

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाप, खा.प्रणिती शिंदेंचा बालेकिल्ला भाजपने केला काबिज; काँग्रेस नेतृत्वाला भाजपने शिकवला चांगलाच धडा

Summary

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे भाजपच्या अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, माळशिरस व पंढरपूर- मंगळवेढा या पाच मतदारसंघांतील उमेदवारांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत चार लाख ८३ हजार १२२ […]

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

भाजपच्या अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, माळशिरस व पंढरपूर- मंगळवेढा या पाच मतदारसंघांतील उमेदवारांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत चार लाख ८३ हजार १२२ मते मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊनही २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मतदान तब्बल एक लाख ३२ हजार ८५९ मतांनी वाढल्याचे दिसून आले. त्यात लाडक्या बहिणींची साथ मोलाची अन्‌ निर्णायक ठरली आहे.
लेक लाडकी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अव्वल ठरलेल्या खासदार प्रणिती शिंदेंचा शहर मध्य मतदारसंघ म्हणजेच काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने काबिज केला आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून प्रणिती शिंदे सलग तीनवेळा आमदार झाल्या. लोकसभा निवडणूक जिंकल्यावर काँग्रेस हा बालेकिल्ला राखणार का? याची सर्वांनाच उत्सुकता होती.
मोठ्या मताधिक्याने प्रणिती शिंदे खासदार झाल्याने त्या शहर मध्यचा बालेकिल्ला राखतील, असा विश्वास अनेकांना होता; मात्र मोची, मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेस नेतृत्वाला भाजपने चांगलाच धडा शिकवला.
महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला येणारा हा मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपने स्वत:कडे घेतला. त्यांचा पहिलाच उमेदवार येथून विजयी झाला. या मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी उमेदवाराने एक लाखावर मते घेतली आहेत.
विशेष बाब म्हणजे, देवेंद्र कोठेंनी एक लाखावर मते घेत पहिल्याच निवडणुकीत आमदारकीची लढाई जिंकली. ज्या मतदारसंघाच्या आमदाराने लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला धुळ चारली, त्याच प्रणिती शिंदेंचा विधानसभा मतदारसंघ भाजपने मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *