BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा धाडसी निर्णय! जि.प.शाळांबद्दल प्रशासनाची मोठी घोषणा

Summary

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक धाडसी निर्णय घेतला आहे. कारण लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या.त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जावे लागले होते. तर त्यापैकी अनेकजण हालाकीची परिस्थिती आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे शिक्षणापासून वंचित राहिले होते. नेमकी तीच […]

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक धाडसी निर्णय घेतला आहे. कारण लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या.त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जावे लागले होते. तर त्यापैकी अनेकजण हालाकीची परिस्थिती आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे शिक्षणापासून वंचित राहिले होते.

नेमकी तीच कमतरता हेरत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जूनच्या कालावधीत उन्हाळी सुट्टीची तरतूद केली आहे. मात्र यंदाच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून शिक्षकांना केवळ 15 दिवसांचीच सुट्टी देण्यात येणार आहे.

लॉकडाउनमुळे राज्यासह जिल्हाभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. मात्र या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

तर अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणच घेता आले नाही. त्यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मे महिन्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी मागील वर्षभरात विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे चांगले लक्ष दिले आहे.

मात्र, तरीही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करून दररोज दोन तसाचा वर्ग भरविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आपल्या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे.

‘कोरोना काळात सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देत आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले आहे.

परंतु, कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत काही तासांची शाळा सुरु ठेवण्याचे नियोजन केले आहे’ अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *