BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

सोनखांब लगतच्या खाद्य तेल कंपनी समोर अवैध दारू दुकान बंद करण्याची मागणी काटोल उत्पादन शुल्क व पोलीसांचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Summary

काटोल – नागपुर- काटोल राज्य महामार्गावरील काटोल पासून 12कि मी अंतरावरील सोनखांब गावालगतच्या काटोल तालुक्यामध्ये भूमी पुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणार्या नामांकित खाद्य तेल उत्पादक कंपणी समोरच अवैध देशी दारू, मोहाची ‌दारू सह अन्य अमली पदार्थांचे अवैध विक्रि केद्रातून मोठ्या […]

काटोल –
नागपुर- काटोल राज्य महामार्गावरील काटोल पासून 12कि मी अंतरावरील सोनखांब गावालगतच्या काटोल तालुक्यामध्ये भूमी पुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणार्या नामांकित खाद्य तेल उत्पादक कंपणी समोरच अवैध देशी दारू, मोहाची ‌दारू सह अन्य अमली पदार्थांचे अवैध विक्रि केद्रातून मोठ्या प्रमाणा देशी विदेशी व मोहाच्या ‌दारूची अवैध विक्री सुरू आहे.
अवैध दारू सह अन्य अमली पदार्थांचे सेवनाची विक्री करनारा तथाकथित राजकिय पदाधिकारी व या अवैध धंदे करणारा‌ तथाकथीत व्हाईट कॉलर सत्तारूढ नेत्याचा आका कोण? हाच शोधाचा विषय आहे.
काटोल पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर काटोल अमरावती व पुढे या राज्य महामार्गावर उघड पुणे अवैध मोहादारू, देशी दारू व गांजा ‌व अंन्य अमली पदार्थांची खुले आम विक्रि‌ सुरू आहे.
खाद्य तेल कंपन्यांनी चे काही कामगार आपली मासीक कमाई या अवैध दारू चे दुकानातच चढावा चढवतात.
येथील अवैध दारू व अन्य अमली पदार्थांचे दुकान चालवत असणार्याला काटोल चे सत्तारूढ नेत्यांचा‌ वरद हस्त असल्याने काटोल पोलीस किंवा नागपूर जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखे कडून खुली सुट मिळाल्याचे सांगितले जाते. कधी काळी प्रोवेशन ची केस करायची झाल्यास संबंधित अवैध दारू विक्रेता ‌ज्या कुणाचे ‌नांव देईल त्याचेवर एककिकडे गुन्हा दाखल दुसरी कडे स्पाट जामीन होते अशी माहिती आहे.
आता !सोंनखाम, मेंढे पठार सोनमोह येथे अवैध भट्टी लाऊन मोहाची दारू निर्मिती होत असते अशी ही माहिती सुत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी काटोल चे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयीन पथक, ‌पोलीस अधिक्षक नागपूर यांचा स्पेशल स्काड, यांचे मार्फत नागपूर -काटोल मार्गावरील सोनखांब गावालगतच्या खाद्य तेल उत्पादक कंपणी समोरचे अवैध दारू व अमली पदार्थांचे विक्रि केंद्राचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी कंपनी चे अनेक कामगार तसेच सोनखांबवासी यांचे कडून केली जात आहे.
अथील अवैध धंदे व्यवसायीक हा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी अल्याने या भागातील नागरिक लेखी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही
या प्रकरणी नागपूर जिल्हा पालकमंत्री यांनी सहकार्य करावे अशी मागणी या भागातील सोनखांब,चारगाव,मेटपांजरा,ताराबोडी येथील युवक व गावकऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येथील अवैध दारू व्यवसायी शासकिय दारू दुकान/बिअर बार उघडण्यासाठी राजकिय नेत्यांकडे हेलपाटे मारत असल्याचे ही सांगितले जाते.
*उत्पादन शुल्क विभागाची भूमिका बघ्याची*
नागपूर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे काटोल येथे स पो नि दर्जा चे अधिकारी नियुक्त आहेत. काटोल नागपूर मुख्य मार्गावरील अवैध दारू चे दुकानांबाबद काटोल उ.शु. विभागाचे अधिकार्यांना माहिती नसावी?हे उ.शु. विभागाचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *