गडचिरोली महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

सेवाभावाने साजरा झाला मान. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस – गडचिरोलीत मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन..

Summary

गडचिरोली, २२ जुलै २०२५ राज्याचे यशस्वी नेतृत्व, कर्तुत्ववान, विकासदृष्टी संपन्न आणि लोकहिताचे सन्मान करणारे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस गडचिरोलीत सेवाभावाने साजरा करण्यात आला. या औचित्याने मा. खा. डॉ. अशोकजी नेते (राष्ट्रीय महामंत्री – भाजपा […]

गडचिरोली, २२ जुलै २०२५
राज्याचे यशस्वी नेतृत्व, कर्तुत्ववान, विकासदृष्टी संपन्न आणि लोकहिताचे सन्मान करणारे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस गडचिरोलीत सेवाभावाने साजरा करण्यात आला.
या औचित्याने मा. खा. डॉ. अशोकजी नेते (राष्ट्रीय महामंत्री – भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

यामध्ये समाजातील दुर्बल व वंचित घटकांना थेट लाभ होईल अशा चार महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश होता –
1. दृष्टीहिनांसाठी सेन्सिटिव्ह स्टिकचे वाटप

दृष्टीहिन व दिव्यांग बांधवांसाठी सेन्सिटिव्ह स्टिकचे वितरण करण्यात आले. ही स्टिक दिशा, अडथळे यांची पूर्वसूचना देते. त्यामुळे स्वावलंबनासोबतच त्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो.
2. मतीमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बोदली येथील मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले. शिक्षणाचा आनंद आणि आत्मभान निर्माण करणारा हा उपक्रम विशेष स्वागतार्ह ठरला.
3. ‘माणुसकीचा घास’ उपक्रमाअंतर्गत अन्नदान वाटप

गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्न पुरवण्यात आले. उपक्रमामागे माणुसकीची भावना आणि उपाशी पोटाला दिलासा देण्याची जाणीव होती.
4. अपंग मुलींना नवीन कपडे व सॅनिटरी साहित्याचे वाटप

वडसा (देसाईगंज) व या परिसरातील येथून आलेल्या अपंग मुलींना कपडे आणि सॅनिटरी साहित्य देण्यात आले. आत्मसन्मान आणि आपुलकीचा आधार देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.

या सर्व उपक्रमांचे सूत्रधार मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून करण्यात आले होते. कोनसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या स्टील हब प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी या सेवाभावी उपक्रमांची आखणी करत एकीकडे औद्योगिक विकास तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपली.

या सेवाभावी कार्यक्रमात प्रामुख्याने शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवार, माजी नगराध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भूपेश कुळमेथे, झोपडपट्टी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्याम वाढई, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन साखरे, कार्यालय प्रमुख फुलचंद वाघाडे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा नांदगावकर, महेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.
दिव्यांग बांधव, महिला भगिनी आणि तरुण वर्ग यांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला. “सेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वाने प्रेरित होऊन आजचा दिवस गडचिरोली जिल्ह्यासाठी सेवाभावाचे पर्व ठरला.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आणि मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या कृतीशील सहभागाची प्रचिती या सेवाभावी उपक्रमांतून जनतेला अनुभवता आली.

 

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
  गडचिरोली चामोर्शी
    गजानन पुराम
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *