गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

सेवानिवृत्त शिक्षकांची सभा संपन्न

Summary

गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सभा इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील खाजगी शाळा मधील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते एकरकमी मिळण्यासाठी […]

गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सभा इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील खाजगी शाळा मधील माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते एकरकमी मिळण्यासाठी 21 नोव्हेंबर 2022 पासून शिक्षणाधिकारी( माध्यमिक) यांचे कार्यालय समोर बेमुदत उपोषण करणे, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देणे, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये दर पाच वर्षांनी १०% वाढ करणे, सेवानिवृत्त शिक्षकांना रेल्वेमध्ये वयाच्या ६० वर्षानंतर तिकीट भाड्यात पूर्ण सवलत देणे इत्यादी मागण्या शासनापुढे रेटण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सभेला श्री शेषराव येलेकर, राजेंद्र लांजेकर, जयंत येलमुले, घनश्याम दिवटे, विनोद चौधरी, दिवाकर कोपुलवार, प्रकाश दुधे, अरविंद बळी, अरुण पालरपवार, जगदीश लडके जगदीश मस्के, बंडू हजारे, मुनिश्वर बोरकर इत्यादी निवृत्त शिक्षक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *