सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका करण्याच्या मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना
Summary
मुंबई, दि. 22 : लम्पी चर्मरोग नियंत्रण व क्षेत्रीय भेटीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून वाहने उपलब्ध करून द्यावीत. तसेच दि.30 सप्टेंबर 2022 पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव […]
मुंबई, दि. 22 : लम्पी चर्मरोग नियंत्रण व क्षेत्रीय भेटीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून वाहने उपलब्ध करून द्यावीत. तसेच दि.30 सप्टेंबर 2022 पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरत्या पशुचिकित्सालय पथकांवर 65 सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुकांचे आदेश पशुसंवर्धन आयुक्त यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणाबाबत राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.
यावेळी मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव यांनी लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पशुपालकांच्या लम्पी आजाराविषयी पूर्ण सहकार्य करावे. तातडीने उपचारासाठी उपलब्ध व्हावे. लसमात्रा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या आहे. लसीकरण जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.