हेडलाइन

सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी

Summary

सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी   कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम […]

सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी

 

कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.

 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार श्रीराम देवराव कांमडे यांचे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा कन्हान येथे बँक खाते क्र २३५३५४७८२३ चे बचत खाते असुन १० वर्षापासुन बॅंकेत व्यवहार सुरु आहे. शुक्रवार (दि.४) मार्च २०२२ ला बॅंकेत किसान क्राप्ट लोनचे पैसे भरण्याकरिता गेले असता पासबुक प्रिंट केली तर श्रीराम कांमडे यांचे बँक खाते नं. २३५३५४७८२३ मधील (दि.३१) डिसेंबर २०२१ ते मंगळवार (दि.१) मार्च २०२२ पर्यंत १८ वेळा एटीएम मधुन पैसे काढ ल्याचे दिसुन आले. एकंदरित कोणीतरी अज्ञात आरोपीने ९७,७४६ रुपये काढल्याने कन्हान पोलीसां नी फिर्यादी श्रीराम देवराव कांबड यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

संजय निंबाळकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *