गोंदिया महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

सूक्ष्म नियोजनातून गोंदियाच्या विकासासाठी खा.पटेल कटिबद्ध – राजेंद्र जैन मरारटोली येथे मंडई मेला चे यशस्वी आयोजन

Summary

प्रतिनिधि गोंदिया        खासदार श्री प्रफुल पटेल यांनी नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. गोंदिया मेडिकल कॉलेज इमारतीचा बांधकामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत. बिरसी विमानतळ वरून नियमित विमान सेवा सुरु होणार आहे […]

प्रतिनिधि गोंदिया

       खासदार श्री प्रफुल पटेल यांनी नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. गोंदिया मेडिकल कॉलेज इमारतीचा बांधकामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत. बिरसी विमानतळ वरून नियमित विमान सेवा सुरु होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला व व्यापाऱ्याला चालना मिळेल. शेतकरी व विकासाकरिता व शहरातील विविध समस्याना प्राधान्याने सोडविणासाठी पूर्ण प्रयत्न करू, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करणे, गोंदिया शहरातील अनेक समस्या मार्गी लावून विकासाच्या प्रवाहात आणणे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले.

न्यू यंग बॉय मंडई मेला द्वारा व स्व. नारायणजी शेंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे, मरारटोली, गोंदिया येथे दिवाळीच्या पावन पर्वावर मंडई निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंडईच्या यशस्वी आयोजना बद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

यावेळी सर्वश्री राजेंद्रजी जैन, सचिन शेंडे, नरेश चौधरी, अखिलेश सेठ, केतन तुरकर, सुनील भालेराव, खेमराज शेंडे, व्यंकट पाथरू, बबली चौधरी, चंद्रकुमार चुटे, आशीष धार्मिक, लखन बहेलिया, रौनक ठाकूर, सोनु मोरकर, राजु लिमये सहीत मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *