सुरक्षा रक्षकांचा अतिकालिन भत्ता आता प्रलंबित राहणार नाही – डॉ. संजय बापेरकर
Summary
सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना विहीत वेळेत दिला जावा व त्यांची आर्थिक पिळवणुक थांबवावी यासाठी उपायुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती ‘म्युनिसिपल कर्मचारी सेने’चे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली. तब्बल १३ महिन्यांचा […]
सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना विहीत वेळेत दिला जावा व त्यांची आर्थिक पिळवणुक थांबवावी यासाठी उपायुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहीती ‘म्युनिसिपल कर्मचारी सेने’चे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली. तब्बल १३ महिन्यांचा अतिकालिन भत्ता लेखा अधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे प्रलंबित होता. त्यामुळे युनियनच्या मागणीनुसार सुरक्षा खात्याचे उपप्रमुख सुरक्षा अधिकारी,सहाय्यक सुरक्षा अधिकारी,लेखा अधिकारी,उपप्रमुख लेखापाल,लेखापरिक्षक यांच्यासमवेत उपायुक्त (वित्त) यांच्या दालनात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
ड्युटीवर येताना सुरक्षा रक्षक १ मिनिट ते २९ मिनिट उशिरा आला तर त्याचा अर्धा तास व ३१ मिनिट ते ६० मिनिट उशिरा आला तर एक तास कापण्यात येत होता. यापुढे अतिकालिन भत्ता काढताना जेवढे मिनिट उशिर होईल तेवढेच मिनिट अतिकालिन भत्ता काढताना कापावे असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अतिकालिन भत्ता काढताना हाताने नोंदी न करता संपुर्णपणे संगणकीय पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेल्याने आता सुरक्षा रक्षकांचा अतिकालिन भत्ता प्रलंबित राहणार नाही असे डॉ. बापेरकर म्हणाले.