नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

सुनील सोलव व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये जिल्ह्यातून प्रथम

Summary

कोंढाळी वार्ताहर- दुर्गाप्रसाद पांडे- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे महाराष्ट्रातील तंत्र स्नेही शिक्षकांकरिता राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील सोलव यांचा […]

कोंढाळी वार्ताहर- दुर्गाप्रसाद पांडे-

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे महाराष्ट्रातील तंत्र स्नेही शिक्षकांकरिता राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील सोलव यांचा नागपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांनी वर्ग 9 व 10 च्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयाच्या व्हिडिओची निर्मिती व सादरीकरण केले. हा व्हिडिओ तालुकास्तर व जिल्हास्तर दोन्ही स्तरावर प्रथम ठरला शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा राहावी व दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती व्हावी ज्यातून विद्यार्थ्यांचे आकलन अधिक सुलभ होईल याकरिता या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासनाने केलेले होते. प्रत्येक पुरस्कार प्राप्त शिक्षकाला एनसीईआरटी तर्फे प्रमाणपत्र व राज्य शासनातर्फे रोख बक्षीस मिळणार आहे. सुनील सोलव यांचे युट्युब वर इंग्लिश विषयाबद्दल मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडिओ आहेत व त्यांचं स्वतःचं इंग्लिश फॉर स्टुडंट्स नावाचे युट्युब चॅनेल सुद्धा आहे त्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना होत आहे एक नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शिक्षक शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. शिक्षण विभागाच्या विविध प्रशिक्षणामध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विविध स्तरावर काम करीत असतात त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य सुधीर बुटे व संस्थाध्यक्ष राजेशजी राठी सचिव डॉ श्यामसुंदर लद्धड यांनी अभिनंदन केले. आमच्या संस्थेतील शिक्षकांच्या प्रतिभेची दखल शासन स्तरावर घेण्यात येणे ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे असे उद्गार प्राचार्यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *