सुकळी रेती घाटावर महसूल व पोलीस विभागाची धडक पाच ट्रॅक्टर वर कारवाई मोहाडी पोलिसात ट्रॅक्टर जप्त कारवाईमुळे रेती तस्करात धडकी
प्रतिनिधी तुमसर
तुमसर तालुक्यातील सुकळी (दे.) येथील रेती घाट रेती तस्करी करिता प्रसिद्ध आहे. मागील अनेक महिन्यांपासून या घाटाचा लिलाव नसताना रेती तस्कारांनी येथील नदीपात्र पोखरून काढले आहे. तुमसर तालुका रेती तस्करांसाठी हब बनले असून संपूर्ण तालुक्यात रेती तस्करांचे जाळे पसरले आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी तुमसर उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार बाळासाहेब टेळे, यांच्या महसूल विभागाने व भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने कारवाईदरम्यान नदीपात्रात रेती तस्करांच्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई केली.
रेती तस्करावर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने तस्करांचे तालुक्यात धाबे दणाणले आहेत. शनिवारी, गुन्हे अन्वेषण विभाग भंडारा, महसूल प्रशासन तुमसर व मोहाडी पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने सुकळी रोहा घाटावर धाड घातली.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सदर कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. यात पाच ट्रॅक्टर नदीपात्रातून अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. नदीपात्रात रेती तस्करांनी ट्रॅक्टर सोडून धूम ठोकली असली तरी पाचही ट्रॅक्टर चालक मालकांवर मांढळ तलाठी देवानंद उपराळे यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात २४३/२०२३ कलम ३७९/३४, सह कलम ४८(७) महाराष्ट्र जमीन अधिनियम सुधारित २०१५ सह कलम ५०/१७७ अन्वये मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात आरोपी चालक मालक दीपक बांडेबुचे रा. रोहा याचे ताब्यातील त्याचे मालकीचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६/२४२४९ असून त्यात अंदाजे १ ब्रास रेती ३ हजार रुपये, चालक-मालक नरेश आगाशे रा. रोहा ता. मोहाडी, जि. भंडारा यांचे ताब्यातून स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल १६६५ असून १ ब्रास ३ हजार रुपये, चालक व दुर्गेश नामदेव मते रा. ढोरवाडा ता. तुमसर जि. भंडारा याचे ताब्यातून स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ झेड ५७३३, चालक-मालक पंकज सपाटे रा. रोहा तालुका मोहाडी, यांच्या ताब्यातून स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर बिना नंबरचा एमएच ३६/६९७६ व ट्रॉली बिना नंबरची, चालक-मालक सोमेश्वर मारबते रा. उमरवाडा याचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर, अशा एकूण पाच ट्रॅक्टर व ट्रॉलीवर कारवाई करीत एकूण वीस लाख पंधरा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर तहसीलदार बाळासाहेब टेळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, मोहाडी पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. सदर पाचही ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून चालक, मालकावर मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. पोलीस व महसूल विभागाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.