महाराष्ट्र रायगढ़ हेडलाइन

सीमेवर आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित – मंत्री आदिती तटकरे

Summary

रायगड (जिमाका)दि.5:- ज्या ज्या वेळी देशावर संकट येतं, त्या त्या वेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम देश, नंतर कुटुंब असतं. सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवर आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्याच्यामुळे आपलं स्वातंत्र्य टिकून […]

रायगड (जिमाका)दि.5:- ज्या ज्या वेळी देशावर संकट येतं, त्या त्या वेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम देश, नंतर कुटुंब असतं. सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवर आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्याच्यामुळे आपलं स्वातंत्र्य टिकून आहे. सैनिकांमुळेच आपण शांतपणे श्वास घेऊ शकतो, सुरक्षित आहोत असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव तहसिल कार्यालय येथे आयोजित ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमात केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसिलदार विकास गारुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुलेझ, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सैनिक, सैनिक विरपत्नी यांसह कर्मचारी उपस्थित होते.

हिरकणी कक्षाचे उद्घाटन

तहसिल कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांसाठी ‘हिरकणी कक्ष’ व अभ्यागत कक्षाचे उद्घाटन कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या माजी सैनिक वीर पत्नींचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी कोणतेही प्रतीक्षा कक्ष नसेल त्यांनी थेट आमच्या दालनात येऊन आपल्या व्यथा सांगाव्यात त्वरित त्यांची कामे केली जातील. माणगाव येथील सैनिक विश्रामगृहाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल, असेही आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

सैनिक सेवेत कार्यरत असलेल्या व सेवा निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची कोणतीही कामे व अडचण असल्यास ती तात्काळ प्रामुख्याने सोडविण्यात येतील, असे प्रांताधिकारी संदिपान सानप व तहसिलदार विकास गारुडकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *