सि.एस.टी.पी.एस.,चंद्रपूर येथील कामगारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य विज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ची कार्यकारणी घोषित.सदर कार्यकारीनीमध्ये भाई सदानंद पि.देवगडे यांची अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड.
चंद्रपूर:- शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा चंद्रपुर नियोजन समिती सदस्य मा. बंडूभाऊ हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 04 मे 2024 रोज शनिवारला ठीक दुपारी 2:00 वाजता मा. बंडूभाऊ हजारे यांच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय अध्यक्ष मा. भाई चैनदासजी भालाधरे, पावर फ्रंट संघटना सरचिटणीस मा.नचिकेतजी मोरे व विदर्भ जनरल लेबर युनियन (सी टू) अध्यक्ष मा.वामन जी बूटले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 ,चंद्रपूर ची कार्यकारणी गठित करण्यात आली.*
सदर कार्यकारणीच्या अध्यक्षपदी मा. भाई सदानंद पी देवगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर
संयुक्त कृती समिती सचिवपदी मा. युवराज मैंद, उपाध्यक्षपदी
मा.प्रमोद कोलारकर, उपाध्यक्षपदी मा. हेरमन जोसेफ, उपाध्यक्षपदी
मा.निताई घोष, उपाध्यक्षपदी मा. संघपाल धोटे, कार्याध्यक्षपदी
मा.शंकर बागेसर, संघटकपदी
मा.संतोष ढोक, कोषाध्यक्षपदी
मा.मंगेश चौधरी, सहसचिवपदी
मा.प्रफुल्ल सागोरे, प्रसिद्धी प्रमुख
मा.रवि पवार, सल्लागारपदी
मा.वामन बुटले यांची तसेच कार्यकारिणी सदस्य : मा.मारोती झाडे, मा. राजेश नन्नावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आहे.
दरम्यान नियोजीत बैठकीत महानिर्मिती कंपनीतील महाराष्ट्रातील तमाम कंत्राटी कामगारांना आपले मुलभुत न्याय हक्क मिळावे, याकरिता संयुक्त कृती समिती समन्वयाने व समोपचाराने लढा देण्यास कटीबद्ध असेल असा मनोदय बहुमताने सदर बैठकीत घेण्यात आला. उर्जा विभाग, कामगार विभाग व सामान्य प्रशासन यांचे स्तरावर कंत्राटी कामगारांचे प्रलंबीत मागण्याविषयी समस्त संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ता ऐकदिलाने न्यायीक लढा लढण्यास तत्पर राहु असेही सदर बैठकीत ऐकमताने निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीस भाई हरीभाऊ चौरे रोजंदारी मजदुर सेना शाखा अध्यक्ष खापरखेडा, भाई सुभाषसिंग बावरे केंद्रीय प्रभारी रोजंदारी मजदुर सेना,भाई महेंद्र बागडे,मनोजभाई घरडे संस्थापक सदस्य रोजंदारी मजदुर सेना, भाई विवेकानंद मेश्राम चंद्रपुर जिल्हाध्यक्ष रोजंदारी मजदुर सेना,मा.लहु मरसकोल्हे सचिव पावर फ्रंट संघटना चंद्रपुर, मा.किशोर गाडगे उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण संघटना चंद्रपुर, मा.अमोल मेश्राम चंद्रपुर जिल्हाध्यक्ष म.रा.सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार संघटना, मा.संतोष पारखी चंद्रपुर जिल्हाध्यक्ष शिवसेना भारतीय कामगार संघटना व इत्यादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उपरोक्त बैठकीच्या कार्यक्रमाचे संयोजक मा.युवराज भाऊ मैंद यांचे दिशा निर्देशाप्रमाणे नियोजीत बैठक संपन्न करण्यात आली.