सिहोरा पोलिसांची कारवाई — 18.12 लाखांचा बेकायदेशीर रेतीवाहतूक प्रकरण उघड; विनानंबर मीनी-टिप्पर जप्त
सिहोरा | दि. 04 डिसेंबर 2025
सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेतीवाहतुकीवर लक्ष्य ठेवत पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी एक मोठी कारवाई करत विनानंबर मीनी-टिप्परसह 18.12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी दुर्गेश गेंदलाल लांजे (वय 27, रा. सोंड्या, ता. तुमसर, जि. भंडारा) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
घटनेचा तपशील
दिनांक 04 डिसेंबर 2025, सकाळी 09:15 ते 09:30 वाजण्याच्या दरम्यान चा.पो.शि. नोबेश चंद्रकांत मोठघरे हे टेमनी- सोंड्या मार्गावर (पश्चिम 6 किमी) पेट्रोलिंग dutyवर होते. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचा विनानंबर टाटा मीनी-टिप्पर संशयास्पदरीत्या वेगाने येताना दिसला.
पोलीसांनी वाहन अडवून तपासणी केली असता—
वाहनामध्ये 2 ब्रास अवैध रेती (किंमत 12,000 रुपये) आढळली
वाहन चालकाकडे कोणताही पास/परवाना नव्हता
टिप्परची किंमत अंदाजे 18,00,000 रुपये
अशा प्रकारे एकूण 18,12,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीसांनी आरोपीकडे विचारपूस केली असता तो रेतीची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे उघड झाले. पर्यावरणाचे नुकसान करण्याचा हा गंभीर प्रकार असल्याने आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
कायदेशीर कारवाई
फिर्यादीचे लेखी तक्रारीवरून, व ठाणेदारांच्या आदेशानुसार, आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सिहोरा येथे कायमी गुन्हा क्रमांक 297/2025 नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा खालील कलमान्वये दाखल—
कलम 305(ई) भारतीय न्याय संहिता
कलम 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता
कलम 7, 9 पर्यावरण संरक्षण अधिनियम
जप्त माल
टाटा कंपनीचा पिवळ्या रंगाचा विनानंबर मीनी-टिप्पर — किंमत 18,00,000 रुपये
2 ब्रास रेती — किंमत 12,000 रुपये
एकूण मुद्देमाल: 18,12,000 रुपये
पुढील तपास
या प्रकरणाचा तपास पोहवा कळपाते करीत आहेत.
संपर्क: मो. 8408032528
—
संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
