सिल्लोड सोयगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय येणार एकाच आवारात
Summary
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तालुक्यात प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी; दोन्ही तालुक्यांना मिळणार प्रत्येकी 10 कोटींचा निधी सिल्लोड, (प्रतिनिधी, ता. 9 ): औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली आहे. राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री […]
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तालुक्यात प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी; दोन्ही तालुक्यांना मिळणार प्रत्येकी 10 कोटींचा निधी
सिल्लोड, (प्रतिनिधी, ता. 9 ): औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली आहे. राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे या कामासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी 10 कोटीं याप्रमाणे 20 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
जनतेचा त्रास कमी करण्याचा मानस……
ग्रामीण भागातून प्रशासकीय कामासाठी आलेल्या सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या कार्यालयात फिरावे लागते. मात्र हे कार्यालय लांब लांब असल्याने सर्वसामान्यांची फरफट होते. जनतेची ही फरपट थांबवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक दिवसापासून प्रयत्न करीत होते. दोन्ही तालुक्यात प्रशासकीय भवनासाठी प्रत्येकी 10 कोटींचा निधी मंजूर झाल्याने जनतेचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय वगळता इतर सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच आवारात येणार आहेत. त्यामुळे जनतेची फरफट आता थांबणार आहे.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
शेख चांद
सिल्लोड