सिल्लोड नगर परिषदेचा उपक्रम भुमर यंत्राच्या सहाय्याने करण्यात आली शहराची स्वच्छता दोन दिवसात शहर केले सॅनेटाईझ
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.14, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार रविवार ( दि.14 ) रोजी भुमर यंत्राच्या साहाय्याने शहरातील मुख्य रस्ता तसेच बाजारपेठे ची स्वच्छता करण्यात आली. तसेच शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनची संधी साधत नगर परिषदेने संपूर्ण शहरात सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करीत निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रइस पठाण, शंकरराव खांडवे, सुधाकर पाटील, अनिल कुरेशी, जितू आरके, मनोज झंवर, आरेफ पठाण, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, मुख्याधिकारी सय्यद रफिक यांच्यासह नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड