BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सिंचन योजनेचा लाभ मिळावा यासाठी जमा केलेले कागदपत्र गहाळ? सबंधित अधिकारी झोपेत ?

Summary

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि १ मे २०२१ गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला उत्तरदायी, विकास योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याच्या घोषणा केल्या जातात.परंतु झिंगानूर परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाकडून सिंचनाची बोरवेल व विहिरीच्या आम्बेडकर योजना राबविण्यात यावी अशी अपेक्षा […]

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि १ मे २०२१
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला उत्तरदायी, विकास योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याच्या घोषणा केल्या जातात.परंतु झिंगानूर परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाकडून सिंचनाची बोरवेल व विहिरीच्या आम्बेडकर योजना राबविण्यात यावी अशी अपेक्षा होती . गरिब शेतकऱ्यांना शेतात सिंचनाची सोयी सुविधा उपलब्ध करून मिळेल या उध्देशन शेतात धान पीक आणि इतर पिके घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, शासनाकडून आम्बेडकर योजनांची अंमलबजावणी केली जाईल आणि सिंचन सुविधांचा लाभ मिळेल म्हणून सन २०१३ ते. २०१७ पर्यंत आपलाईन अर्ज भरणे सुरु झाली आहे, त्यानंतर पुन्हा सन २०१८ ते. २०२०, पर्यंत आनलाईन अर्ज दाखल करण्यात आली आहे, मागील ८, वर्षे पासुन केवळ अर्ज भरणे सुरु करण्यात आली आहे, ५ वर्षे आपलाईन अर्ज दाखल करण्यात आली आहे, आणि गोरगरीबांना पैसे नाही. सिंचनाचा इनवेल व ठूवेलबोरवेल अर्ज दाखल करण्यात आले आहे, परंतु पैसे नसल्याने गरिब शेतकऱ्यांना शासनाकडून सिंचन ठूवेलबोरवेल बोरवेल अद्यापही मंजुरी नाही. इतर मोजक्या शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात येत असल्याचे विश्वसनिय वृत्त हाती आले आहे, शेतकऱ्यांच्या शेतात कोणत्याही प्रकारची सिंचनाची सोय नाही, म्हणून अर्ज दाखल केले आहे, परंतु ते अजऀ कुठे गायब होत आहेत. याची काहीच माहिती अधिकार आणि संबंधित कर्मचारी देत नाही, गरिब असलेल्या शेतकऱ्यांकडे पैसे नसलेमुळे शासनाच्या सर्व योजन्यात वंचित राहावे लागत आहे.?? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पैसे आहेत त्यांनाच सर्व काही मंजुरी देण्यात येत आहे, क्षेत्रातील आता कोणत्या कुटुंबातील सिंचनाची सोय उपलब्ध करून घेतली आहे, आणि उर्वरित शेतकरी किती आहे. तरी मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी गुप्त चौकशी करावी. आणि दोषींना निलंबित करण्यात यावे. कोणत्याही शेतकरी कुटुंबातील सातबारा आठ नुसार शेतातील शासकीय योजना तुन सिंचन विहिरी व इनवेल टूवेलबोरवेल मिळाली, आणि किती सातबारा नुसार उर्वरित किती आहे, काही शेतकरी अनेक वर्षेपासुन शासकीय योजनेचा लाभ मिळावे म्हणून अर्ज भरले आहे, झिंगानूर परिसरातील आठ, 8, पासुन अर्ज शेतातील टूवेलबोरवेल इनवेल विहिरी यासाठी भरुन मंजुरी दिली जात आहे, पैसे असलेल्या शेतकऱ्यांना एकच अर्ज दाखल करताच मंजुरी दिली जात आहे, सन 2020, कोणत्याही वरिष्ठ पदधिकारी सिंचन योजना मंजुरी देणारे आधिकारी, मा, सिंचनमंत्री, मा खासदार, मा आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सिंचन योजना चा सर्व पदधिकारी कर्मचारी आनलाईन मधे आपलाईन मधेही तपासणी करून त्रुटी असलेले कागदपत्रे कमी असलेले कागद साठी नोटीस देण्यात यावे आणि जातीचे प्रमाणपत्र,(कस्ट) सातबारा, आठ, B. P. L. दाखल, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, वर्षिक उत्पन्न दाखल, आधार कार्ड, बँकेचे पास बुक, रेशन कार्ड , आधीवास प्रमाणपत्र , रहिवासी दाखल ग्रामसेवकचे ग्रामपंचायत ठराव, एवढे कागदपत्रे दरवर्षी देत आहे, परंतु हे कागदपत्रे जातात कुठे या कागदपत्रांची आनलाईन मधून तपासून त्रुटी कागदपत्रांची नोटीस पाठवावे. सर्व अर्जादार शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंपदा मंत्री यानी काळजी घेवुन गोरगरीब शेतकऱ्यांना शासकीय योजनातुन टूवेलबोरवेल व इनवेल बोरवेल सोय सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे म्हणून मागणी करीत आहे, परिसरातील अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *