सावित्रीबाई फुले यांची जयंती नवी दिल्लीत साजरी
Summary
नवी दिल्ली, दि. 3 : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या […]
नवी दिल्ली, दि. 3 : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, डॉ. प्रतिमा गेडाम, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योतकौर अरोरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकसभा सचिवालयाचे सहसंचालक आर. गणेश, प्रवीण अत्रे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी श्री.गणेश व श्री. अत्रे यांना लोकराज्य अंक भेट स्वरुपात देण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाची माहिती जाणून घेतली.
000000