BREAKING NEWS:
अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

‘सायंटिफिक पार्क’मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर ‘सायन्सकोर’वर तारांगण

Summary

अमरावती, दि. 28  : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती भव्य सायन्सकोर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या […]

अमरावती, दि. 28  : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती भव्य सायन्सकोर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केले.

सायन्सकोर मैदानावर सायंटिफिक पार्कचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले. मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक व इतर सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

सायन्सकोरवर तारांगण

सायंटिफिक पार्कमध्ये प्लॅनेटोरियमची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तारांगणाची शास्त्रीय माहितीसह अनुभूती अमरावतीकरांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, विज्ञानविषयक प्रदर्शनाचाही पार्कमध्ये समावेश आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधीतून हा सुंदर प्रकल्प उभा राहणार आहे.

विहित मुदतीत काम पूर्ण करा

सायंटिफिक पार्कच्या रूपाने एक महत्वाचा प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारत आहे. त्याची नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकामंत्र्यांनी यावेळी दिले.

सायन्सकोर मैदानावर संरक्षण व सौंदर्यीकरण अंतर्गत १ कोटी ५२ लाख रुपये निधीतून मैदानाचे गेट, कुंपण भिंत, ४०० मीटर पेव्हिंग व जॉगिंग ट्रॅक बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी वृक्षारोपण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केली व  खेळाडू, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. त्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.

00000

निवडणूक यंत्रणेचा उपक्रम

‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेसाठी आता स्वतंत्र गोदाम; पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि. 28 : निवडणुकीतील महत्वपूर्ण साधने असलेल्या ‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट” यंत्रणा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदामाची उभारणी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.

माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख,  महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर,  सुरेश निमकर, जयंतराव देशमुख,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार आदी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाकडून या कामासाठी 14 कोटी 99 लक्ष रुपये निधीच्या नियोजनाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे हे काम होत आहे.

अशी असेल रचना

गोदाम इमारतीची तळमजला व पहिला मजला अशी रचना असेल. एक हजार 926 चौरस मीटर जागेत तळमजल्यावर 6 मतमोजणी कक्ष असतील. मतदान यंत्रणेसाठी  सुरक्षा कक्ष असेल. दर्शनी भागात आवक जावक कक्ष, स्वच्छतागृह आदी सुविधा असतील. पहिल्या मजल्यावर कार्यालय असेल. त्याशिवाय, सुरक्षेसाठी मजबूत आवारभिंती, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था आदी बाबी असतील.

यंत्रणेची सुस्थिती व सुरक्षितता राखण्यासाठी हे गोदाम उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *