नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

सामाजिक एकोपा जपून आप आपले धर्मोत्सव साजरे करू या! उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे गणेशोस्तव व ईद शांततेत,उत्साहात साजरा करा प्रशासनाचे जनतेला आवाहन पोलीस ,स्थानिक प्रशासनाची गणेशमंडळासोबत बैठक गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या नगर पालिका -ग्रामपंचायती कडून गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव पर्यावरणपूरक गणेशोत्सव आयोजनाला प्रोत्साहन उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन

Summary

वार्ताहर -काटोल /कोंढाळी:- दुर्गा प्रसाद पांडे पर्यावरणपूरक,शिस्तीत व धर्मोत्सववाला घालून दिलेल्या नियमावली चे पालन करून आप आपले धर्मोत्सववाला उत्साहात (गणेशोस्तव) साजरा करण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन काटोल उपविभागीय राजस्व ,पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था […]

वार्ताहर -काटोल /कोंढाळी:- दुर्गा प्रसाद पांडे पर्यावरणपूरक,शिस्तीत व धर्मोत्सववाला घालून दिलेल्या नियमावली चे पालन करून आप आपले धर्मोत्सववाला उत्साहात (गणेशोस्तव) साजरा करण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन काटोल उपविभागीय राजस्व ,पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच, विसर्जनासाठी कृत्रिम तलावातच मुर्ती विसर्जन करण्यात सहकार्य करावे असे आवाहनही प्रशासन व पोलिस प्रशासना कडून करण्यात आले आहे.या प्रसंगी उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन ही करण्यात आले आहे.

काटोल-नरखेड शहर व दोन्ही तालुक्यामध्ये यावर्षी पर्यावरणपोषक गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने ०८सप्टेबर रोजी दुपारी ०४-३०वाजता उपविभागीय अधिकारी काटोल, उप विभागीय पोलीस अधिकारी काटोल ,आणि तहसीलदार काटोल यांचे कार्यालयाने संयुक्तरित्या काटोल उपविभागीय अधिकारी यांचे सभागृहात संयुक्तरीत्या तालुक्यातील गणेशमंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केलीहोती. य यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. उपविभागीय राजस्वअधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहम, तहसीलदार राजू रणवीर, डी जे जाधव,नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, नरखेड बी डी ओ, डॉ शैलेश वानखेडे,काटोल बी डी ओ दीपक गरूड , विभागीय वीज अभियंता दिपक आगाव,
यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशन ठाणेदार काटोल खोब्रागडे , कृष्णा तिवारी -नरखेड, पंकज वाघोडे कोंढाळी, मनोज चौधरी जलालखेडा, नायब तहसीलदार राजेंद्र जंवजाळ,विजय डांगोरे, रामकृष्ण जंगले, भागवत पाटील,संजय भुजाडे, तसेच
तालुका व नगर परिषद, पंचायत समिती चे अधिकारी व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
*डी जे ची परवानगी नाही*
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांनी दिली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवा दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण न होता कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी डी जे चा वापर करू नये यासाठी सर्व मंडळांनी सहकार्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेश मंडळांनी वर्गणीसाठी नागरिकांना जबरदस्ती करु नये, पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी शॉर्ट सर्कीट होणार नाही याची दक्षता घ्यावी, सीसीटिव्ही लावावेत,आपत्तीजनक देखावे उभारु नये आदी सूचना त्यांनी दिल्या.

‘गणेश विसर्जन’ आणि ‘ईद’ उत्सव हे 28 सप्टेंबर रोजी साजरे होणार आहेत, हे लक्षात घेता सामाजिक सौहार्द राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक वापरण्यासंदर्भातील सूचना तसेच विसर्जनासाठी शहरात उभारण्यात आलेले कृत्रिम तलाव, मार्ग याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे यांनी दिली.

काटोल तसेच नरखेड ‌नगर परिषद हद्दित पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नगरपरिषदे तर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सी ओ धनंजय बोरीकर यांनी दिली. मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमुर्त्यांची स्थापना व्हावी तसेच विसर्जनासाठी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी ‌नगरपरिषदने कडुन कृत्रिम तलावात मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रांवर गणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणुकीप्रसंगी नागरिकांनी स्वयं शिस्त पाळण्याचे आवाहनही या प्रसंगी सी ओ धनंजय बोरीकर यांनी केले.

राज्यात देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्काराबाबत जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांनी सूचना दिल्या आहेत त्यानुसार तालुक्यातही/ जिल्ह्यातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवराज पडोळे यांनी दिली. राज्यातून पहिल्या तीन पुरस्कारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्यातील गणेश मंडळ पुरस्कार पटकावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यस्तरावर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी,पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@
gmail.comया ईमेलवर अर्ज १६सप्टेबर पर्यंत करावेत….
उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेतील सहभागासह गणेश मंडळांनी पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता निवडणूक प्रक्रिया व जनतेच्या सहभागाबाबत जनजागृती करणारे देखावे उभारण्याचे आवाहनही शिवराज पडोळे यांनी केले.

यावेळी उपस्थित गणेश मंडळ व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अय्युब पठाण, विजय महाजन, प्रमोद धारपुरे, दिगांबर डोंगरे ,दुर्गा प्रसाद पांडे, बबलू बिसेन, रियाज शेख,अडचणी मांडल्या व प्रशासनातर्फे त्याचे निराकरण करण्यात आले. या प्रसंगी काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे माजी सभापती धम्मपाल खोब्रागडे, उपसभापती निशिकांत नागमोते पं स सदस्य अरुण उइके, लताताई धारपुरे तसेच काटोल नरखेड तहसील मधील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.काटोल चे तहसीलदार राजू रणवीर यांनी प्रास्ताविक सुत्रसंचलन केले तर काटोल बी डीओ दिपक गरूड आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *