BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीत कौशल्य विकासावरही भर -मंत्री ॲड.आशिष शेलार

Summary

मुंबई, दि. ०३ : राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून कशा देता येतील, याचा कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केल्या. […]

मुंबई, दि. ०३ : राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून कशा देता येतील, याचा कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केल्या.

राज्याच्या सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक मंत्रालयात मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मागील कार्यकाळात धोरण निर्मितीत योगदान दिलेले सदस्य आणि नव्या अंमलबजावणी समितीच्या सदस्यांसोबत ही बैठक झाली. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली. मान्यवरांनी विविध सूचना मांडल्या.

यावेळी पद्मश्री गिरीष प्रभूणे, संगीतकार कौशल इनामदार, श्रीमती अनिता यलमटे, आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, सुनील दादोजी भंडगे, लेखक अभिराम भडकमकर,  शितूदादा म्हसे, पत्रकार  राजेश प्रभु साळगावकर, जगन्नाथ कृष्णा दिलीप, दर्शनिका विभाग कार्यकारी संपादक व सचिव. डॉ. दिलीप बलसेकर, सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे, पुराभिलेख संचालनालय संचालक सुजितकुमार उगले, साहित्य अकादमी सहसंचालक सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण सचिव संतोष खामकर उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *