सह्याद्री वाहिनीवर उद्या (२२ राेजी) राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम
Summary
मुंबई, दि. २१: राज्यातील १०९ गुणवंत शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार समारंभाचे प्रसारण रविवार […]
मुंबई, दि. २१: राज्यातील १०९ गुणवंत शिक्षकांचा ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार समारंभाचे प्रसारण रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून केले जाणार आहे.
मुंबईतील एनसीपीएच्या सभागृहात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांना हा समारंभ पाहता आला नाही, त्यांच्यासह सर्वांनी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणारा हा कार्यक्रम अवश्य पाहावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. निर्माता जयु भाटकर आणि वैष्णो व्हिजन यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.