सर्व सामान्य जनतेची सेवा करणारा डॉक्टर हरपला। — डॉ महेश पापडकर यांचे कोरोना ने निधण।
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी दि 14 मे. 2021:-
देसाईगंज येथिल वैद्यकिय क्षेञासह सामाजिक धार्मिक व राजकिय क्षेञात आपल्या कर्तुत्व शैलिने असाधारण नावलौकिक पावलेले डॉ महेश पापडकर यांचे आज दि १३ ला ब्रम्हपुरी येथिल खाजगि रुग्णालयात कोरोणा उपचारा दरम्यान निधन झाले। डॉ महेश पापडकर यांच्या ४६ वर्षाच्या जिवनप्रवासात त्यांनी गोरगरिब जनतेची निःस्वार्थपणे सेवा केली राञी अपराञी येणार्या रुग्णांना कधिच निराश केले नाही रुग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा म्हनुण त्यांनी आपले वैद्यकिय व्रत अंगिकारले होते त्यांच्या उपचारशैलित नेहमिच धार्मिकतेचे दर्शन घडत होते विपस्सी साधक म्हनुणही ते परिचीत होते त्यांनी २००८ ते २०११ या अडिच वर्षाच्या कालावधित देसाईगंज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ही भुषविले होते त्या कालावधित त्यांनी देसाईगंज शहरात विविध विकासकामांचाओघ आणल होता सर्वांचे मंगल होवो अशी अंतरमनी भावना जोपासनारे डॉ महेश यांच्या अकालि मरनाणे देसाईगंज शहरात शोककळा पसरली त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील भाऊ वहिनी संत परिवारातिल भाविक मंडळी विपस्सना साधक वर्ग आणि देसाईगंज व परिसरातिल बहुसंख्य चाहता वर्ग असुन त्यांचे निधनामुळे सर्वञ शोककळा पसरली आहे