सर्व गुण संपन्न बालक हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 चा समृद्ध भारताचा भक्कम पाया होय. आमदार चरणसिंग ठाकूर
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20250120-WA0010.jpg)
नागपूर/कोंढाळी – खामला येथील रॉयल पैलेस हॉलमध्ये 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता वासाआय कॉम् डिजीलर्न प्रा. लि.कंपनी चे वतीने 11वी राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस वैदिक गणित परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रमा काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या आरोग्य सेवा आघाडीच्या पदाधिकारी डॉ.प्रितीताई मानमोडे, ऍड दिपकराव केणे, डॉ.परिणिता फुके, राजू चरडे, श्रावण फरकडे, कमलाकर चोपडे, सचिन बोवाडे, रोशन गकरे, दुर्गा प्रसाद पांडे, रंजना भोयर- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या संचालिका,
परफेक्ट कॉन्हेंट. संचालिका श्रद्धा गलघाटे, एंजल किड्स कॉन्व्हेंटचे संचालक विजय उगले, नव ज्योती कॉन्व्हेंटचे संचालक अमित गाडे, फाइव्ह स्टार कॉन्व्हेंटच्या संचालिका संगीता हरणखेडे, तसेच साधना आगलावे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले. *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांचा भारत* यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सांगितले की लहान बालकांना विद्यार्थ्यांना समृद्ध भारताचे समृद्ध नागरिक बनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणसंपन्न असने आवश्यक आहे.. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2047 चा समृद्ध भारत हेच उद्दिष्ट आहे, आणि आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ही सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना एकाच राष्ट्रीय व्यासपीठावर आणणे आणि त्यांच्या मानसिक अंकगणित आणि मस्तिष्क कौशल्यांचे मूल्यमापन करणे हा आहे. अशा प्रकारे ते मानसिक आणि बौद्धिक कौशल्य व सुदृढ व निरोगी स्पर्धा जे अप्रत्यक्ष गुणवत्ता ओळख देखील प्रदान करते. यातूनच सशक्त, समृद्ध ,भारत घडविण्याचे स्वप्न आपल्या पंतप्रधानांचे आहे . असे मार्गदर्शन याप्रसंगी केले. त्याच प्रमाणे, या कार्यक्रमाप्रसंगी परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले, हे सर्व पंतप्रधान मोदींच्या 2047 च्या स्वप्नांशी सुसंगत आहेत. आहे. अशा प्रकारच्या शैक्षणिक परीक्षांचा प्राथमिक शिक्षणात समावेश करण्यात यावा, यासाठी या विषयावर राज्याचे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री (सरकार) यांच्याशी चर्चा करून आशी माहिती आमदार चरणसिंह ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन वसाकॉम डिजीलर्न प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालिका सपना चोपडे, व संचालक राजू चोपडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक राजू चोपडे यांनी केले, याप्रसंगी डॉ.प्रितीताई मानमोडे, डॉ.परिणिता फुके, दुर्गा प्रसाद पांडे, एड दिपकराव केने, राजू चरडे, श्रावण फरकाडे, कमलाकर चोपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक एमडी राजू चोपडे यांनी केले तर सूत्रसंचालन मैताली व अमृता यांनी केले तर आभार सपना चोपडे यांनी मानले.