सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना : ऑनलाइन वर्ग असणाऱ्या शाळांनी फी कपात करावी.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना : ऑनलाइन वर्ग असणाऱ्या शाळांनी फी कपात करावी.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ८मे.२०२१
कोरोना च्या काळात थेट शाळेत जाऊन शिक्षण घेण्यावर साधारण वर्षभराहून अधिक काळापासून निर्बंध लावण्यात आले आहेत.
तरीही ऑनलाईन वर्ग सुरु ठेवत शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष मात्र पूर्ण करण्यात आले.
याच धर्तीवर आता शाळांनी विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या फी मध्ये कपात करावी अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की.,विद्यार्थ्यांना न पुरवण्यात आलेल्या सुविधांसाठीचै पेसे आकारणे शाळांनी टाळावे.
ऑनलाईन वर्ग असणाऱ्या शाळांनी फी कपात करावी.
ऑनलाईन वर्ग सुरु असल्याने शाळा चालवण्याचा खर्च कमी असून कोरोनाच्या काळात शाळा व्यवस्थापनाने संवेदनशील भूमिका घ्यावी. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवले आहे.