सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना करणार्या सहसंचालकावर कार्यवाही करण्याची मागणी…
Summary
संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेत हजारो आरोग्य कंत्राटी कर्मचारी अल्पशा मानधनावर काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत.या कंत्राटी कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संघटनांनी न्याय हक्कासाठी अनेकदा रितसर लढा दिला याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.मात्र […]
संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेत हजारो आरोग्य कंत्राटी कर्मचारी अल्पशा मानधनावर काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत.या कंत्राटी कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संघटनांनी न्याय हक्कासाठी अनेकदा रितसर लढा दिला याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.मात्र अभियान सहसंचालक डा विजय कंदेवाड यांनी चुकीचा अभिप्राय लिहून शासनाची दिशाभूल करीत सर्वोच्च न्यायालयाचा आणि भारतीय राज्यघटनैचा अवमान केल्याने त्यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडी नागपूर जिल्हा सहसचिव आनंद मेश्राम यांनी केली आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 प्रमाने समान काम समान वेतन देने गरजेचे आहे.समान काम केल्यानंतरही अल्प वेतन देने हे भारतीय कायद्याने शोषण केल्यासारखे असून मानवतेच्या विरोधात आहे.असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती जे एस केहर आणि न्यायमुर्ती एस के बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केल्यानंतरही सहसंचालक डॉ विजय कंदेवाड यांनी अधिकाराचा गैरवापर करून चुकीचा अभिप्राय देऊन कंत्राटी कर्मचार्यांवर अन्याय करण्यासाठी शासनाची दिशाभूल करीत भारतीय राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे अवमान करणार्या डा कंदेवाड यांचेवर तात्काळ गुन्हा का करण्यात येऊ नये. ..अशी मागणी करीत आहे. .