सरस्वती विद्यालय संविधान दिन साजरा
Summary
अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या छाया घाटे पर्यवेक्षक महेश पालीवाल,प्रा. एन. लाडसे, प्रा. टी.बिसेन , वरिष्ठ शिक्षक कुंडलिक लोथे, सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत होणारे […]
अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या छाया घाटे पर्यवेक्षक महेश पालीवाल,प्रा. एन. लाडसे, प्रा. टी.बिसेन , वरिष्ठ शिक्षक कुंडलिक लोथे, सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत होणारे होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान पुस्तकाचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. संविधानामुळे लोकशाही बळकट झाली आहे देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश पूर्ण होईल असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी.पठाण यांनी केले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन दिपाली कोट्टेवार तर आभार शशिकांत लोणारे यांनी मानले. या दिनाचे औचित्य साधून एन.एस.एस,स्काऊट/ गाईड,आर. एस.पी. विद्यार्थ्यांची रॅली नगरातील संविधान चौकात काढण्यात आली. तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी अर्जुनी/मोर.च्या नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, ग्रामवासी प्रदीप खोब्रागडे,सोनदास गणवीर, पर्यवेक्षक महेश पालिवाल, जी एम बी प्राचार्या शव्या जैन, तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.सदर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन करून आभार जोत्सना शेळके यांनी मानले.