सरस्वती विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय अर्जुनी मोर. येथे दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा
Summary
भंडारा: सरस्वती विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्था अध्यक्ष मा. डाॅ. बल्लभदासजी भुतडा, मा. जयप्रकाशजी भैय्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पठाण सर, उपप्राचार्य श्रीमती घाटे मॅडम, पर्यवेक्षक […]

भंडारा:
सरस्वती विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय अर्जुनी मोरगाव
येथे दहीहंडी व गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्था अध्यक्ष मा. डाॅ. बल्लभदासजी भुतडा, मा. जयप्रकाशजी भैय्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पठाण सर, उपप्राचार्य श्रीमती घाटे मॅडम, पर्यवेक्षक मा. पालिवाल सर, मा. गांधी सर, श्रीमती जैन मॅडम, वरिष्ठ शिक्षक मा. बिसेन सर यांनी गोपाळ कृष्ण व दहीहंडी यांना माल्यापऀण करून वंदन केले. व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मान्यवरांनी व विघार्थानी, आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून सर्व विधार्थी
राधा कृष्णाच्या वेषभुषा परिधान करून आलेले होते. या प्रसंगी सर्व बालगोपालांनी नृत्य सादर करुन आपली कला प्रदर्शित केली. गोपाल काला करण्यात येऊन सर्व विघार्थाला
गोपाल काल्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष मनोगतातून या दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका र्वूदांचे सहकार्य मिळाले.