गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे महा वाचन चळवळ उपक्रम साजरा

Summary

अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा महावाचन चळवळ उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अर्जुनी/मोर.पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, विषय तज्ञ सत्यवान शहारे, पडोळे, […]

अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाचा महावाचन चळवळ उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अर्जुनी/मोर.पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, विषय तज्ञ सत्यवान शहारे, पडोळे, मुख्याध्यापक गुढेवार, शाळेच्या उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालिवाल होते. सर्वप्रथम माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यापऺन करण्यात आले. ग्रंथ व पुस्तकाचे वाचन मानवाला सुसंस्कृत बनवते असे अध्यक्षीय मार्गदर्शन होमराज पुस्तोडे यांनी केले.पुस्तके माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेतात असे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी केले.तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा असे मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी दीपक जीभकाटे, ज्योती शेळके या शिक्षकांनी तर देवयानी कारवार, माही नाकाडे,जिज्ञासा कोल्हे या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे संचालन व आभार मनीषा सपाटे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *