गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयाने राखली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा पुष्पक तानसेन डांगे व त्रुपल सौरभ शहारे तालुक्यातून तृतीय

Summary

अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 13 मे 2025 ला जाहीर करण्यात आला.यात अर्जुनी/ मोर येथील सरस्वती विद्यालयाचा निकाल 99.37टक्के लागला असून पुष्पक तानसेन डांगे व त्रुपल सौरभ शहारे […]

अर्जुनी मोर.:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 13 मे 2025 ला जाहीर करण्यात आला.यात अर्जुनी/ मोर येथील सरस्वती विद्यालयाचा निकाल 99.37टक्के लागला असून पुष्पक तानसेन डांगे व त्रुपल सौरभ शहारे 97 टक्के गुण घेऊन संयुक्तपणे तालुक्यातून तृतीय तर कु. साक्षी अशोक खरकाटे 95.80% गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय तर कु. गोजिरी अरविंद ऊके व संस्कार सोपान शेकडे 95.00 टक्के गुण घेऊन संयुक्तपणे विद्यालयातून तृतीय ठरली आहे.
सरस्वती विद्यालयातून 160 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 90% पेक्षा जास्त 23 विद्यार्थी, प्राविण्य श्रेणीत 67,प्रथम श्रेणीत 54, द्वितीय श्रेणीत 12 व पास श्रेणीत 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले अनुज तारेश डोंगरे (94.40),कु. अनुष्का विलास कारेवार (94.40), मनस्वी चित्तरंजन चांदेवार(94.00), भाग्यश्री नरेश भैसारे (93.60), स्वरित रूपराम धकाते (93.20), शर्वरी मंगेश ढोमणे (93.00), क्रिश प्रदीप चकोले(92.00), धनश्री अनिल कापगते (91.60), हेमंत मुनेश्वर गहाणे(91.60), ओमकार दुर्योधन भोंडे(91.40), सनम नुतेंद्र नंदनवार(91.20), मुकुंद लालकृष्ण करंजेकर (91.20), कु. लक्ष्मी रामचंद्र मेंढे(90.80), कु. विद्या दशरथ कोरे(90. 60), कु. धनीषा वीरेंद्र खोब्रागडे(90.20),कु. चेतना कृष्णा गहाणे(90.20),कु. कस्तुरी परमानंद बागडे (90.20), तोवेश ज्ञानदीप राऊत(90.00) शाळेतील सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा,संस्था सचिव सर्वेश भुतडा, कोषाध्यक्ष जयप्रकाश भैय्या,प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *