गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयात सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन कार्यक्रम संपन्न

Summary

अर्जुनी/मोर. – स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच एस.डी. कॉन्वेंट, जी.एम.बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे […]

अर्जुनी/मोर. – स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच एस.डी. कॉन्वेंट, जी.एम.बी. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे उत्साहवर्धक ठरला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्या अर्चना गुरुनुळे, पर्यवेक्षक शिवचरण राघोते, शव्या जैन आणि कल्पना भूते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षिका दिपाली गोल्लीवार यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास, अर्थ आणि त्यामागील राष्ट्रभक्तीचा भाव विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षकवर्गांनी गीताचे तीनही कडवे एकत्रितपणे गायले. सभागृह देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले.

कार्यक्रमानिमित्त विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर आधारित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अतिथींनी प्रदर्शनीचे अवलोकन करून विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जे. डी. पठाण म्हणाले, “‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नाही, तर आपल्या भारतभूमीच्या महत्तेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी या गीतातून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेची भावना जपावी.”

याच कार्यक्रमात स्काऊट-गाईड स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्काऊट विभागप्रमुख सुजित जक्कुलवार यांनी स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमाचे संचालन दिपेश्वरी मेंढे यांनी केले, तर आभारप्रदर्शनही त्यांनीच मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवर्गांनी सहकार्य केले.

संकलन:- गणेश सोनपिंपळे, वरिष्ठ पत्रकार, भंडारा गोंदिया प्रतिनिधी, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *