सरस्वती विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
Summary
अर्जुनी मोर:- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, जी.एम.बी.च्या प्राचार्या शव्या जैन, सरस्वती विद्यानिकेतन […]

अर्जुनी मोर:- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, जी.एम.बी.च्या प्राचार्या शव्या जैन, सरस्वती विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका कल्पना भुते,समन्वयक भगीरथ गांधी,प्रा.टोपेश बिसेन, प्रा. नंदा लाडसे यांची होती. सर्वप्रथम जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती ज्योती शेळके यांनी दिली. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे अध्यक्षीय मार्गदर्शन प्राचार्य जे.डी.पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार ज्योती शेळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.