सरस्वती विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
Summary
अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी.पठान तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या अर्चना गुरुनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते, वरिष्ठ […]
अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य जे.डी.पठान तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्या अर्चना गुरुनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते, वरिष्ठ शिक्षक कुंडलीक लोथे, माधुरी वनवे यांची होते.सर्वप्रथम लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य जे. डी.पठाण यांनी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांप्रमाणेच देशभक्ती बरोबरच समाजसेवेचे व्रत सुद्धा अंगिकारावे असे प्रतिपादन केले. तसेच उपप्राचार्य अर्चना गुरूनुले व पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते यांनी सुद्धा लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या दिनाचे औचित्य साधून वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री सिडाम तर आभार ज्योत्स्ना शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकावृंदानी सहकार्य केले.
