सरस्वती विद्यालयात युवा दिन व जिजाऊ माता जयंती साजरी
Summary
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे प्रा.टोपेश बिसेन, सरस्वती विद्यानिकेतन च्या […]
अर्जुनी मोर:-
स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे प्रा.टोपेश बिसेन, सरस्वती विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका कल्पना भूते होते. सर्वप्रथम माता सरस्वती ,माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले .
विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व माता जिजाबाई यांचे विचार आत्मसात करून मार्गक्रमण करावे म्हणजेच जीवन सुनिश्चित होते असे अध्यक्षीय मार्गदर्शन प्राचार्य जे.डी.पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार
प्रा. एन. के. आगवान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले