सरस्वती विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
Summary
अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,विद्यानिकेतन प्राथमिक शाळा,जी.एम.बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त वतीने महाराष्ट्र दिनाचा 65 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठान होते,तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल,पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, […]

अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,विद्यानिकेतन प्राथमिक शाळा,जी.एम.बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त वतीने महाराष्ट्र दिनाचा 65 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठान होते,तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल,पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे, जी.एम.बी.विद्यालय व महाविद्यालयाच्या प्राचार्या शव्याजैन, समन्वयक भगीरथ गांधी, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भूते, वंदना शेंडे यांची होती. प्रमुख अतिथी प्रा.नंदा नागपूरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. संचालन करून आभार अर्चना गुरूनुले यांनी मानले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.