सरस्वती विद्यालयात मराठी भाषा प्रचार अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन
Summary
अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा प्रचार व प्रसार उपक्रम अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी. पठाण सर तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण पंचायत समिती अर्जुनी/ […]

अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा प्रचार व प्रसार उपक्रम अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी. पठाण सर तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण पंचायत समिती अर्जुनी/ मोर.व उपप्राचार्य महेश पालीवाल उपस्थित होते.
मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात वाढविणे सोबत कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्याचा भाग म्हणून शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.सरस्वती विद्यालयात मराठी भाषा विभागाच्या वतिने मराठी भाषेचा विकास संवर्धन व अभिवृद्धी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांकरिता निबंध,वक्तृत्व,वादविवाद यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत एकूण १५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,कार्यक्रमाच्या अतिथिनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या निबंधांचे अवलोकन केले याचप्रमाणे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत इयत्ता नववी व अकरावीच्या नव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात पुनम ताराम, उन्नती गोलदार, अनुराग बोरकर,सुहास डोंगरे, नूतन ब्राह्मणकर, प्रिन्स डोंगरे, परिणीता नाकाडे,या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीचे उत्कृष्ट सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे.डी. पठाण सर यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे, कारण ती आपली मातृभाषा आहे.व मातृभाषेच्या अधिकाधिक वापराने आपले ज्ञान समृद्ध करता येईल असे मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी अनिल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आल्याचे सांगितले सोबत स्पर्धा परीक्षां मध्ये मराठी विषयावर सामान्य ज्ञान महत्त्वाचे ठरते जेणेकरून आपण अशाच परीक्षा सहजतेने उत्तीर्ण करू शकतो, अशी उपस्थित त्यांना माहिती दिली
कार्यक्रमाचे संचालन व आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक इंद्रनील काशीवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करिता राष्ट्रीय सेवा योजना व मराठी भाषा विभागातील कु, ए. ए.गुरणुले, एस.जे.जक्कुलवार, कु, डी. एम. मेंढे, प्राध्यापक के,डब्ल्यू कापगते, प्राध्यापक एम. एस. शेंडे, प्राध्यापिका एल.डब्ल्यू.शिरसागर यांचे सहकार्य लाभले.