सरस्वती विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Summary
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल,पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे वरिष्ठ शिक्षिका श्रीमती वनवे मॅडम व प्राध्यापक बिसेन होते. सर्वप्रथम ज्ञानेश्वर माऊली व ओमच्या […]

अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य महेश पालीवाल,पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे वरिष्ठ शिक्षिका श्रीमती वनवे मॅडम व प्राध्यापक बिसेन होते. सर्वप्रथम ज्ञानेश्वर माऊली व ओमच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. गुरु हे साक्षात परब्रम्ह असतात ते आपल्याला अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशाची वाट दाखवितात असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातुन प्राचार्य जे.डी.पठान यांनी केले. तसेच उपप्राचार्य महेश पालीवाल व पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे यांनी सुद्धा गुरू बद्दल आपले मत व्यक्त केले.यावेळी मुलींनी ‘हे सद्गुरु मेरे तुम’ व ‘सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू’ हे गीत सादर केले. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वहस्ते बनवलेले शुभेच्छापत्र प्राचार्य व शिक्षकांना दिले. या दिनाचे औचित्य साधून वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले यात वर्ग 5 ते 8 साठी गुरु-शिष्य वर आधारित कथाकथन तर वर्ग 9 ते 12 साठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी समृद्धी गणेश नाकाडे व आभार प्राध्यापिका शेळकेनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य घेतले.