BREAKING NEWS:
गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Summary

अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र 2024-25 मधील वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा तर […]

अर्जुनी मोर.:- स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र 2024-25 मधील वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा तर प्रमुख उपस्थिती केशरबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश भैया, उपाध्यक्ष भावेश भुतडा, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,जी. एम.बी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी, सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भुते यांची होती. सर्वप्रथम माता सरस्वती व शाळेचे संस्थापक स्वर्गीय घनश्यामदास भुतडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आमच्या शाळेचे नेहमी ध्येय असते त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो असे अध्यक्षीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते एच.एस.सी.व एस.एस. सी.मध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभार अर्चना गुरुनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *