गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा

Summary

अर्जुनी मोर:- क्रांती म्हणजे जाणीवपूर्वक घडवून आणलेला आमुलाग्र बदल, क्रांती म्हणजे जुलमी सत्ते विरुद्ध लढा, या लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी ज्यांनी बलिदान केले अशा शहीद हुतात्म्यांना स्थानिक सरस्वती विद्यालयात तसेच हुतात्मा चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी […]

अर्जुनी मोर:- क्रांती म्हणजे जाणीवपूर्वक घडवून आणलेला आमुलाग्र बदल, क्रांती म्हणजे जुलमी सत्ते विरुद्ध लढा, या लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी ज्यांनी बलिदान केले अशा शहीद हुतात्म्यांना स्थानिक सरस्वती विद्यालयात तसेच हुतात्मा चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती वरूनकुमार सहारे उपविभागीय दंडाधिकारी अर्जुनी/मोर, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, ज्ञानेश सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत अर्जुनी/मोर, मंजुषा बारसागडे नगराध्यक्षा नगरपंचायत अर्जुनी/मोर, डॉक्टर उज्वल बावनथळे पशुवैद्यकीय अधिकारी अर्जुनी/मोर. शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, शाळेच्या उपप्राचार्या अर्चना गुरूनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते, जी.एम.बी. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या प्राचार्या शव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी, महेश पालीवाल, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती चे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.तसेच सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जागतिक आदिवासी दिनाबद्दल माहिती देण्यात आली.शहीद स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून व मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी स्काऊट/गाईड,आर.एस.पी. तसेच रा.से.यो चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन करून आभार सुजित जक्कुलवार यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *