सरस्वती विद्यालयात ई लायब्ररीचे उद्घाटन

अर्जुनी मोर:- इन्फोसिस नागपूर डेव्हलपमेंट सेंटर सी. एस. आर .क्लब (प्रयास – एक कोशिश) आणि सरस्वती विद्यालय व क. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे डिजिटल लायब्ररी ई लर्निंग वर्गाचेउद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना ई लर्निंग ची अद्यावत सुविधा देण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात इन्फोसिस नागपूर तर्फे विद्यार्थ्यांना ३१ टॅब वितरित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदासजी भुतडा, तर प्रमुख उपस्थिती कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैय्या, प्राचार्य जे.डी.पठाण, पर्यवेक्षक शिवचरण राघोर्ते यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना इन्फोसिस नागपूर डेव्हलपमेंट सेंटर सीएसआर क्लबचे अमोल गवळी, प्रतिक अवचार, श्रितीश शेटे, स्नेहल साखरे, अभिषेक भानारकर, संकेत सुरकर यांची होती. सदर ई- लायब्ररी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात व त्यांचे शिक्षण सुलभ व्हावे या दृष्टीने अतिशय उपयोगी ठरेल असे अध्यक्षीय मार्गदर्शन संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा यांनी केले. तसेच प्राचार्य जे.डी.पठाण व इन्फोसिसचे प्रमुख अतिथी स्प्रिंगबोर्ड विषयी मार्गदर्शन केले.तसेच शिक्षकांकरिता डिजिटल लायब्ररी व ई लर्निंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार दिपाली गोल्लीवार यांनी मानले.