गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयातील परिणीताची इस्रो येथे प्रशिक्षणाकरिता निवड

Summary

अर्जुनी/मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालयातील इयत्ता नववी वर्गात शिकणारी कुमारी परिणीता गजानन नाकाडे हिची भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो येथे अंतराळ विज्ञानावरील विशेष प्रशिक्षण आणि संशोधनासाठी निवड झालेली आहे. तिने देशव्यापी परीक्षेद्वारे इस्रोच्या युवा वैज्ञानिक कार्यक्रमात आपला स्थान निश्चित केले. शिक्षणाधिकारी […]

अर्जुनी/मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालयातील इयत्ता नववी वर्गात शिकणारी कुमारी परिणीता गजानन नाकाडे हिची भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो येथे अंतराळ विज्ञानावरील विशेष प्रशिक्षण आणि संशोधनासाठी निवड झालेली आहे. तिने देशव्यापी परीक्षेद्वारे इस्रोच्या युवा वैज्ञानिक कार्यक्रमात आपला स्थान निश्चित केले. शिक्षणाधिकारी श्री महेंद्र गजभिये साहेब, शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांनी परिणीता नाकाडे तसेच तिचे मार्गदर्शक शिक्षक वसाके सर यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था शालेय मुलांसाठी युवा वैज्ञानिक कार्यक्रम म्हणजेच युविका नावाचा एक विशेष कार्यक्रम दरवर्षी आयोजित करते. ज्यामुळे तरुणांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जिज्ञासा निर्माण होईल या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि अंतराळ अनुप्रयोगांचे मूलभूत ज्ञान दिले जाईल.इस्रोने ‘कॅच द यंग’ या उद्देशाने हा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) आधारित संशोधन करिअरमध्ये जाण्यास प्रोत्साहन केल्या जाईल. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची आवड निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाची कालावधी दोन आठवडे असेल आणि हा एक निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जो इस्रोच्या सात केंद्रावर आयोजित केला जाईल. या कार्यक्रमासाठी देश पातळीवरून लाखो विद्यार्थ्यांच्या संख्येतून साडेतीनशे विद्यार्थ्यांचीच निवड केल्या जाते. निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या इस्रोच्या केंद्रावर हजर राहावे लागेल. हा प्रशिक्षण कार्यक्रम १९ मे २०२५ ते ३१ मे २०२५ या दरम्यान आयोजित केला जाईल. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा परस्पर संवाद हे इस्रो आणि देशातील नामवंत वैज्ञानिकांसोबत होतो. सोबतच या संपूर्ण निवासी कार्यक्रमाचा खर्च हा इस्रो द्वारे केला जातो.भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने २४ फरवरी २०२५ ते २३ मार्च २०२५ पर्यंत निवड प्रक्रिया राबवली. ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. निवड प्रक्रियेचा निकाल ०७ एप्रिल २०२५ रोजी जाहीर झाला. ज्यामध्ये संपूर्ण देशातून ३५० आणि महाराष्ट्रातून १२ विद्यार्थ्यांमध्ये परिणीता हिने आपलं स्थान निश्चित केला. सदर कार्यक्रमाकरिता १९ मे ते ३१ मे २०२५ दरम्यान परिणीताला “स्पेस अप्लिकेशन सेंटर इसरो, अहमदाबाद” येथे उपस्थित रहावे लागेल. इस्रो मध्ये थेट प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने ती आणि तिचे कुटुंब तसेच संपूर्ण शाळा खूप उत्साहित आहे. सदर विद्यार्थीनीचे
संस्थाध्यक्ष बल्लभदास भुतडा,संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाशजी भैया,संस्था सचिव सर्वेश भुतडा, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण,उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *